मुंबई: शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. आजही सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये काही अंशी घसरण झाली. शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 89 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 22 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.15 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,595.68 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.13 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,222.75 वर पोहोचला आहे.
आज 1426 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1888 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 100 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना मेटल, आयटी, ऑईल अॅन्ड गॅस या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 1 टक्क्यांनी वाढ झाली. तर बँकेच्या इंडेक्समध्ये 1 टक्क्यांची घट झाली आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये अंशत: वाढ झाली आहे.
गुरुवारी शेअर बाजारात Dr Reddy's Laboratories, Coal India, Hindalco Industries, UltraTech Cement आणि Kotak Mahindra Bank, Titan Company, HDFC Bank, ICICI Bank आणि HDFC या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली आहे.
सकाळी घसरणआज बाजाराची सुरुवात झाल्यानंतर ओपनिंग ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला. बुधवारी अमेरिकन बाजारातील तीन प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण दिसून आली होती. त्याचे प्रतिबिंब भारतीय शेअर बाजारावर दिसून आले.
आज सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवात घसरणीसह झाली होती. सेनसेक्स 494.77 अंकांनी घसरला. तर, निफ्टी 150.70 अंकांनी घसरून 17,094 अंकांवर सुरू झाला होता. युक्रेन-रशिया युद्ध थांबत नसल्यानं देखील जागतिक स्तरावरील एक्सचेंजमध्ये पडझडीचे सत्र सुरुच आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारात दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- Gold Silver Rate Today : आज सोने आणि चांदी महाग की स्वस्त? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर
- Indian Railway IRCTC : रेल्वेचा प्रवाशांसाठी मोठा निर्णय, 2 एप्रिलपासून सुरू होणार 'ही' सेवा
- Share Market Updates : शेअर बाजाराची नकारात्मक सुरुवात, सेन्सेक्समध्ये 500 अंकांची घसरण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -
ABP Majha