Mahtari vandan yojana : केंद्र सरकारसह विविध राज्य सरकारे आर्थिकदृष्टा दुर्बल घटकांना मजबूत करण्याचे प्रयत्न करत आहे. यासाठी विविध योजना चावल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकांना आर्थिक पाठबल दिलं जात आहे. अशीच एक महिलांना पाठबळ देणारी योजना छत्तीसगड सरकारनं सुरु केली आहे. महतारी वंदन योजना (Mahtari vandan yojana) असं या योजनेचं नाव आहे. या योजनेचा लाभ विवाह झालेल्या महिलांनाच घेता येणार आहे. त्याचबरोबर विधवा, घटस्फोटित अशा महिलांना देखील सरकार महिना 1000 रुपयांचे आर्थिक पाठबळ देणार आहे.
1 मार्चपासून महतारी वंदन योजनेंतर्गत दरमहा एक हजार रुपये मिळणार
महतारी वंदन योजनेंतर्गत महिलांकडून 5 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार आहेत. महतारी वंदन योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला छत्तीसगडची रहिवासी असणं अनिवार्य आहे. छत्तीसगडमध्ये महिला सक्षमीकरणाची मोदींनी दिलेली हमी पूर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. येथील महिलांना 1 मार्चपासून महतारी वंदन योजनेंतर्गत दरमहा एक हजार रुपये मिळण्यास सुरुवात होणार आहे. 5 फेब्रुवारीपासून या योजनेचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला अनेक आश्वासने दिली होती. या आश्वासनांची पूर्तता करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही योजना राबवण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. महतारी वंदन योजनेअंतर्गत 1 मार्च 2024 पासून महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात होईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 1 जानेवारी 2024 रोजी 21 वर्षे असणे आवश्यक आहे.
दरमहा एक हजार रुपये मिळणार
मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी शनिवारी यासंदर्भात घोषणा केली. महतारी वंदन योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1000 रुपये म्हणजेच या योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला 12 हजार रुपये दिले जातील. हे पैसे थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातील.
अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू
राज्यातील निवडणुकीदरम्यान भाजपने महातरी वंदन योजना जाहीर केली होती. पाच वर्षांनंतर छत्तीसगडमध्ये पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपचे हे आश्वासनही उपयुक्त ठरल्याचे मानले जात आहे. महतरी वंदन योजनेसाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी
महतारी वंदन योजनेंतर्गत महिलांकडून 5 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत. महतारी तरी वंदन योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला छत्तीसगडची रहिवासी असणे अनिवार्य आहे. विधवा, घटस्फोटित महिला देखील महतरी वंदन योजनेचा लाभ घेऊ शकतात.
अर्ज कसा करायचा?
महतारी वंदन योजनेसाठी अर्ज सादर करण्यासाठी https://www.mahtarivandan.cgstate.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. या योजनेसाठी अर्ज विनामूल्य असेल. याशिवाय अर्जासाठी तयार केलेल्या मोबाईल ॲपवर जाऊनही अर्ज सादर करता येणार आहे.
महत्वाच्या बातम्या: