Farmers News: छत्तीसगड सरकारने (Chhattisgarh Govt) शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं कृषी बजेटमध्ये (Agriculture Budget) 33 टक्क्यांची वाढ केली आहे. सरकारने शेतीसाठी एकूण 13,438 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दरम्यान, बजेटमध्ये छत्तीसगड सरकारनं दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आता सरकार शेतकऱ्यांना मोफत वीज देणार आहे. तसेच शेतमजुरांना 10000 रुपये देणार असल्याची घोषणा बजेटमध्ये केली आहे.
छत्तीसगड सरकारने विधानसभेत 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 1,47,446 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये सरकारने कृषी बजेटमध्ये 33 टक्क्यांची वाढ केली आहे. विष्णू सरकारने शेतीसाठी एकूण 13,438 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. छत्तीसगड सरकारने अर्थसंकल्पात कृषक उन्नती योजनेंतर्गत 10,000 कोटी रुपये आणि जल जीवन मिशनसाठी 4,500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना मजबूत करण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील 24.72 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2 लाख 30 हजार अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार मोफत वीज, 3,500 कोटींची तरतूद
छत्तीसगड सरकार शेतकऱ्यांना 5 हॉर्स पॉवरपर्यंतच्या कृषी पंपांसाठी मोफत वीज देणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात 3,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, दीनदयाल उपाध्याय भूमिहीन शेतमजूर योजना विष्णुदेव सरकारने शेतमजुरांसाठी सुरू केली होती. ज्या अंतर्गत भूमिहीन शेतमजुरांना प्रतिवर्ष 10,000 रुपये वार्षिक मोबदला दिला जाईल. यासाठी छत्तीसगड सरकारच्या बजेटमध्ये 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
शेतकरी हे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा
आपल्या वनवासींच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत वनोपज आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी, तेंदूपत्ता संग्राहकांचे मानधन विष्णुदेव सरकारने प्रति मानक पिशवी 4000 रुपये वरून 5,500 रुपये प्रति मानक पोती वाढवल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री ओ.पी.चौधरी यांनी दिली. आपले शेतकरी हे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. हा कणा मजबूत करण्यासाठी विष्णुदेव साईंच्या नेतृत्वाखाली छत्तीसगड सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात कृषक उन्नती योजनेअंतर्गत 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याचा फायदा राज्यातील 24.72 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 02 लाख 30 हजार अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. नवीन सरकारच्या बजेटमध्ये सौर सामुदायिक सिंचन योजनेसाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत 795 हेक्टर शेतजमिनीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात फक्त एक गाजराची पेंडी, हे अर्थसंकल्पाचे भाषण नसून प्रचारसभा; अनिल घनवटांची जोरदार टीका