Car Companies Increase Rate : 2023 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. पुढच्या तीन दिवसानंतर नवीन वर्ष 2024 सुरू होईल. नवीन वर्षाची (New Year) सुरुवात होताच देशात अनेक बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. 1 जानेवारीपासून देशातील अनेक मोठ्या कार कंपन्यांनी वाहनांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या यादीत आलिशान वाहनांचीही नावे आहेत. 1 जानेवारीपासून कोणत्या कार कंपन्या रेट वाढवणार आहेत याची माहिती पाहुयात.


अलीकडेच, Honda Cars India नवीन वर्षापासून म्हणजे जानेवारी 2023 पासून त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवणार आहे. कंपनीने वाढत्या इनपुट खर्चाचे कारण सांगितले आहे. ज्याचा प्रभाव कमी करण्यासाठी, जपानी ऑटोमेकर आपल्या मॉडेल्सच्या किंमती वाढवणार आहे. ह्युंदाई इंडियाने कोणत्या मॉडेलची किंमत किती वाढवली जाईल याचा खुलासा अद्याप केलेला नाही. 


या कंपन्यांनी वाढ केली जाहीर 


Honda 


Honda ने अलीकडेच देशांतर्गत बाजारपेठेतील सर्वात स्पर्धात्मक विभागात तिच्या मायक्रो SUV Elevate सह प्रवेश केला आहे. ही कार सप्टेंबरमध्ये 11 लाख रुपये एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आली होती. पुढील वर्षाच्या सुरुवातीला या गाड्यांच्या किंमतीत वाढ होण्याची  शक्यता आहे.


टाटा 


देशातील सर्वात मजबूत आणि सर्वात मोठी कार कंपनी टाटा मोटर्सनेही आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती 3 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.


मारुती 


मारुती वाहनांच्या किंमतीत वाढ झाली आहे. नवीन वर्षापासून मारुतीने कारच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य वाहनांच्या किमती 2 ते 3 टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहे. त्याचबरोबर लक्झरी सेगमेंटच्या वाहनांच्या किंमती यापेक्षा जास्त वाढण्याची शक्यता आहे.


ऑडी 


लक्झरी कार कंपन्यांबद्दल बोलायचे झाले तर ऑडी नवीन वर्षापासून आपल्या वाहनांच्या किंमती वाढवणार आहे. ऑडीने 2 टक्के वाढ जाहीर केली आहे.


मर्सिडीज


ऑडीशिवाय मर्सिडीजनेही नवीन वर्षापासून वाहनांच्या किमती 2 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन किमती नवीन वर्षापासून म्हणजेच 1 जानेवारीपासून लागू होतील.


महिंद्रा 


एसयूव्ही उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रानेही आपल्या वाहनांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन किमती नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 जानेवारीपासून लागू होतील असे कंपनीने म्हटले आहे. म्हणजेच, जर तुम्ही महिंद्राची स्कॉर्पिओ खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला त्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील.


टोयोटा


टोयोटा कंपनीने 1 जानेवारीपासून भारतात आपल्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. मात्र किमती किती वाढणार हे कंपनीने अद्याप स्पष्ट केलेले नाही.


MG Motors 


MG Motors बद्दल बोलायचे तर MG वाहने पुढील वर्षापासून देशभरात महाग होतील. पोलाद महाग होत असल्याने आणि महाग होत असल्याने वाहनांच्या किंमती वाढत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Popular MPV Waiting Period: वाट पाहिन पण तिलाच नेईल! हायक्रॉस, इनोव्हा क्रिस्टा आणि इनव्हिक्टो खरेदी करायची? जाणून घ्या वेटिंग पीरेड


Car loan Information:

Calculate Car Loan EMI