Capsicum Cultivation: शिमला मिरचीला  (Capsicum Cultivation) कायम मागणी असते. या पिकाच्या माध्यमातून शेतकरी (Farmers) चांगला नफा मिळवू शकतात. शिमला मिरची वर्षभर बाजारात सहज उपलब्ध होते. बाजारात अशा शिमला मिरचीचा दर नेहमीच 40 ते 60 रुपये प्रतिकिलो असतो. त्यातून अनेक प्रकारचे चविष्ट आणि स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. पण सिमला मिरचीचा वापर मुख्यतः भाज्या बनवण्यासाठी केला जातो. दरम्यान, शिमला मिरचीच्या वेगवेगळ्या जाती आहेत. तुम्ही प्रमुख चार जातींच्या शिमला मिरचीची लागवड करुन चांगलं उत्पन्न घेऊ शकता. 


शिमला मिरचीमध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक 


शिमला मिरचीत मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन असतात. फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन के यासह अनेक प्रकारचे पोषक घटक शिमला मिरचीमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. शिमला मिरची खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते असे म्हणतात. यामुळं वर्षभर बाजारात त्याची मागणी कायम राहते. शिमला मिरचीची पहिली लागवड जून ते जुलै या काळात केली जाते. तर दुसरी लागवड ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात केली जाते. तसेच तिसरी लागवड नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात केली जाते. परंतू, तुम्ही 15 जानेवारीपर्यंत लागवड करु शकता, ज्याचे उत्पादन मार्चपासून सुरू होईल.


सर्वोत्तम वाणांची निवड


तुम्हाला शइमला मिरचीची लागवड करायची असेल असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वोत्तम वाणाची निवडा करावी लागेल. जर तुम्ही चांगल्या प्रतीची लागवड केली नाही तर तुम्हाला बंपर उत्पादन मिळणार नाही. कॅलिफोर्निया वंडर, अर्का मोहिनी आणि ओरोबेल यांसारख्या शिमला मिरचीच्या अनेक जाती आहेत, ज्यांची लागवड केल्यावर चांगले उत्पादन मिळते. चला तर मग जाणून घेऊया उत्तम उत्पादन देणाऱ्या वाणांची माहिती.


'हे' आहेत शिमला मिरचीचे सर्वोत्तम 4 वाण 


इंद्र 


इंद्र जातीच्या शिमला मिरचीची लागवड केल्यास 70 ते 75 दिवसात पीक तयार होते. त्यानंतर शिमला मिरचीचे उत्पादन सुरू होईल. एका एकरात इंद्र जातीची लागवड केल्यास 110 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. विशेष म्हणजे इंद्र जातीच्या एका मिरचीचे वजन 100 ते 150 ग्रॅम असते.


सोलन हायब्रिड 2


सोलन हायब्रिड 2 बंपर उत्पन्नासाठी ओळखले जाते. ही एक प्रकारची संकरित वाण आहे. त्याचे पीक लागवडीनंतर 60 ते 70 दिवसांत तयार होते. शेतकऱ्यांनी एक एकरात लागवड केल्यास 135 ते 150 क्विंटल उत्पादन मिळते.


कॅलिफोर्निया वंडर


कॅलिफोर्निया वंडर लागवडीनंतर 70 दिवसांनी पीक तयार होते. त्याची उत्पादन क्षमता 125 ते 150 क्विंटल प्रति एकर आहे. विशेष बाब म्हणजे कॅलिफोर्निया वँड ही कॅप्सिकमची परदेशी जात आहे.


ओरोबेल 


थंड प्रदेशातील हवामान लक्षात घेऊन शास्त्रज्ञांनी ओरोबेल जातीचा शोध लावला आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांनी ओरोबेल जातीची लागवड केल्यास त्यांना बंपर उत्पादन मिळेल. त्याच वेळी, यूपी-बिहारचे शेतकरी देखील याची लागवड करू शकतात. मात्र या राज्यांतील शेतकऱ्यांना त्याची लागवड पॉलिहाऊसमध्ये करावी लागणार आहे. या मिरचीचा रंग पिवळा असतो. यात उच्च रोग प्रतिकारशक्ती आहे.


महत्त्वाच्या बातम्या: