Canada-India Issue : भारत आणि कॅनडा (Canada-India Issue) यांच्यातील राजनैतिक वादाचा मोठा फटका कॅनडाला बसू शकतो. कारण भारत आणि कॅनडा या दोन देशात मोठा व्यापार चालतो. कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत भारताचे मोठं योगदान आहे. दरवर्षी भारतीयांचे तीन लाख कोटी रुपयांचे योगदान कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत आहे. तेथील अनेक क्षेत्रांमध्ये आणि व्यवसायांमध्ये भारतीयांची मोठी गुंतवणूक आहे.
भारतीय दरवर्षी कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत तीन लाख कोटी रुपयांचे योगदान देतात. त्यामुळं कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो, अशी भीती अर्थतज्ज्ञांना वाटत आहे. कॅनडात 20 लाख भारतीयांचा अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात दबदबा आहे. भारतातून कॅनडामध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या 2 लाख विद्यार्थ्यांच्या शुल्कातून 75 हजार कोटी रुपयांचे योगदान कॅनडाला मिळाले आहे.
कॅनडातील या क्षेत्रांमध्ये भारतीय आघाडीवर
भारतात राहणारे लोक कॅनडामधील मालमत्ता, आयटी, संशोधन, प्रवास आणि लघु व्यवसाय या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करतात. भारतीय लोक कॅनडात प्रॉपर्टीमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करतात. भारतानंतर चीन कॅनडात दुसऱ्या क्रमांकावर गुंतवणूक करतात. भारतातील मूळ लोक व्हँकुव्हर, ग्रेटर टोरंटो, ब्रॅम्प्टन, मिसिसॉगा आणि ब्रिटिश कोलंबिया, ओंटारियो इथे दरवर्षी 50 हजार कोटींहून अधिक गुंतवणूक करतात. CII च्या अहवालानुसार, भारतीय कंपन्यांनी कॅनडामध्ये 2023 पर्यंत 41 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर 17 हजार नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. प्रवासाच्या दृष्टीने येथे दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय जातात. 2022 मध्ये 1.10 लाख भारतीयांनी कॅनडात प्रवास केला. याशिवाय किराणामाल आणि रेस्टॉरंटसारख्या छोट्या व्यवसायात 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक भारतीयांनी केली आहे.
कॅनडात शिक्षण घेण्यात भारतीय विद्यार्थ्यांची संख्या जास्त
कॅनडामध्ये दरवर्षी शिकण्यासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, यावेळी भारत आणि कॅनडात सुरु असलेल्या वादामुळे व्हिसा आणि इतर कामांना होणारा विलंब यामुळं ही संख्या कमी होऊ शकते. दुसरीकडे, कॅनडाला फी म्हणून मिळणाऱ्या रकमेत तोटा सहन करावा लागू शकतो.
नेमकं प्रकरण काय?
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी शीख नेते हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमागे भारत सरकार असल्याचा आरोप केला. या आरोपानंतर दोन्ही देशांमधील संबंध चिघळले आहेत. कॅनडा सरकारने भारतीय राजनैतिक अधिकारी पवन कुमार राय यांची हकालपट्टी केली होती. यावर प्रत्युत्तर म्हणून भारतानेही दिल्लीतील कॅनडाच्या उच्चायुक्तालयातून एका वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं दोन्ही देशातील संबध ताणल्याचे दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
"कॅनडामध्ये निज्जरची हत्या हिंदुत्वाचा..."; कॅनडा-भारत तणावादरम्यान पाकिस्तानच्या पंतप्रधानांची प्रतिक्रिया, हिंदुत्त्वाची इसिसशी तुलना