Ryanair Holdings Plc: आज आम्ही तुम्हाला अशा एका सीईओबद्दल (CEO) सांगणार आहोत, जो एक अट पूर्ण केल्यावर लगेचच 905 कोटी रुपये (100 दशलक्ष युरो) मिळण्याचा हक्कदार असणार आहे. मायकेल ओ'लेरी (Michael o leary)असे त्या  सीईओचे नाव आहे. ते  Ryanair Holdings Plc या आयरिश कंपनीचे CEO आहे. त्यांच्याबद्दलची माहिती आज आपण पाहणार आहोत. 


इतके पैसे कसे मिळवायचे


मायकल ओ'लेरीला एवढी मोठी रक्कम मिळण्याची दाट शक्यता आहे. Ryanair Holdings PLC ही कमी किमतीची विमान कंपनी आहे. ही आयरिश कंपनी आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, जर कंपनीचे शेअर्स असेच वाढत राहिले तर लवकरच मायकेलला 2019 च्या अटीनुसार बोनस म्हणून 100 दशलक्ष युरो मिळतील. कंपनीने मायकेलसोबत बाजार आधारित करार केला होता.


मायकल अट पूर्ण करण्याच्या अगदी जवळ 


मिळालेल्या माहितीनुसार, सीईओ मायकल ही अट पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आले आहेत. जर एअरलाइन्सचे शेअर्स 21 युरो दराने 28 दिवस राहिले तर त्यांना 905 कोटी रुपयांचे शेअर्स मिळतील. त्याला 11.12 युरो दराने 10 दशलक्ष शेअर्स दिले जातील. हे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकेल. शुक्रवारी कंपनीच्या शेअर्सची किंमत 18.84 युरोवर पोहोचली होती.


कंपनीच्या शेअर्समध्ये यावर्षी 50 टक्क्यांनी वाढ 


अहवालात दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या शेअर्समध्ये यावर्षी 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. पुढील 12 महिन्यात कंपनीचे शेअर्स 24.10 युरोच्या दरापर्यंत पोहोचू शकतात. यासोबतच कंपनीला मायकलला 905 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. गेल्या वर्षी शेअरची किंमत 13 युरो होती. ही प्रोत्साहन योजना 2028 पर्यंत आहे.


पैसे मिळवण्याचा दुसरा मार्ग कोणता?


प्रोत्साहन मिळवण्याचा आणखी एक मार्ग मायकेलकडे आहे. यानुसार, कंपनीला करानंतर 2.2 अब्ज युरोचा नफा झाला, तरीही मायकेल त्याच्या पैशाचा हक्कदार असेल. नोव्हेंबरमध्ये, रायनएअरने सांगितले होते की यावर्षी त्यांचा नफा 1.85 अब्ज ते 2.05 अब्ज युरो दरम्यान असेल.


मायकेल ओ'लेरी कोण ?


मायकेल ओ'लेरी हा आयर्लंडमधील डब्लिनचा रहिवासी आहे. 1994 पासून ते Ryanair चे CEO आहेत. केपीएमजीमध्ये अकाउंटंट म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ते Ryanair चे संस्थापक टोनी रायन यांचे आर्थिक सल्लागार बनले आणि 2018 मध्ये ते उपमुख्य कार्यकारी बनले. त्याच्याकडे अनेक रेसचे घोडे आहेत. 2018 मध्ये त्यांची संपत्ती एक अब्ज डॉलर्स इतकी होती.


महत्त्वाच्या बातम्या:


10000 रुपयापासून व्यवसायाची सुरुवात, आता 15.65 लाख कोटींची संपत्ती; ना अंबानी ना अदानी…या अब्जाधीशाची गोष्ट आहे वेगळी