Federal Reserve : यूएस फेडरल रिझर्व्हने 1994 नंतर कर्जाच्या व्याजदरात 0.75 टक्क्यांनी सर्वात मोठी वाढ जाहीर केली आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने केलेली 28 वर्षांतील ही सर्वात मोठी व्याजदरवाढ आहे. फेडरल रिझर्व्हने महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, कारण अमेरिकेतील महागाईने 40 वर्षांतील सर्वोच्च पातळी गाठली आहे, महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकी फेडकडून उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अमेरिकेचे नागरिक सध्या किराणा दुकानापासून ते गॅसपर्यंतच्या वाढत्या किमतींशी झगडत आहेत.


महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय
अमेरिकेत महागाईचा मागील 40 वर्षातला उच्चांक असून महागाई दर 8.6 टक्क्यांवर पोहचला आहे, अमेरिकेकडून देखील आर्थिक वाढीऐवजी महागाई दर नियंत्रणात आणण्याला सर्वात प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. व्याजदर वाढल्याने डॉलर मजबूत होईल आणि रुपयाचे आणखी अवमूल्यन होण्याची शक्यता वाढेल. डॉलरच्या तुलनेत भारतीय चलनाने आधीच 78.13 नीचांकी पातळी गाठली आहे. महागाई दराला 2 टक्क्यांपर्यंत आणण्याचं एफओएमसीचं उद्दिष्ट आहे, यावेळी मुख्य दरात वाढ पुन्हा सुरुच ठेवण्याचे संकेत देण्यात आले आहे. 


येत्या काही महिन्यांतही व्याजदरात वाढ


विशेष म्हणजे, बुधवारी परकीय चलन बाजारात अमेरिकन चलनाच्या तुलनेत रुपया 78.22 या सार्वकालिक नीचांकी पातळीवर बंद झाला. फेड रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी येत्या काही महिन्यांतही व्याजदरात वाढ होण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. जेरोम पॉवेलने सूचित केले आहे की, फेड जुलै महिन्यात 0.75 टक्क्यांनी धोरण दर वाढवू शकते. पॉवेल यांनी म्हटले की, फेड महागाईवर नियंत्रण ठेवण्यास पूर्णपणे सक्षम आहे आणि त्यांच्याकडे सर्व उपाययोजना आहेत. 


महत्वाच्या इतर बातम्या


Petrol-Diesel in India : वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी देशातील पेट्रोल आणि डिझेलचे उत्पादन पुरेसे


LPG Gas Connection Price Hike: नवीन गॅस कनेक्शन घेणे महागले, द्यावे लागणार इतके शुल्क


SBI Mutual Fund NAV June 14, 2022: .म्युच्युअल फंड गुंतवणुकीवर मिळतोय चांगला परतावा; जाणून घ्या