stock Market Myths: आपल्यापैकी अनेकांना स्टॉक मार्केट, गुंतवणूक, म्यूचव्हल फंड अशा फायनान्सच्या कितीतरी संकल्पना बऱ्याचदा भीती वाटत असेल. कष्टाचे पैसे यात टाकले आणि शेअर मार्केट पडलं तर सगळे पैसे पाण्यात जातील असं अनेकांना वाटत असतं. यापेक्षा बँकेत पैसे ठेवलेले काय वाईट ?असा अनेकांचा प्रश्न. पण शेअर मार्केटविषयी चूकीच्या माहितीमुळे किंवा काही गैरसमजूती असल्यानं आपण यात पैसे टाकण्यासाठी चाचरत असतो.  तुम्हालाही स्टॉक्समध्ये पैसे टाकायची इच्छा आहे आणि केवळ पैसे बुडतील या भीतीनं तुम्ही त्यात रक्कम टाकण्यास घाबरत असाल तर या 5 गैरसमजूतींना वेळीच दूर करणं आवश्यक आहे. 


गैरसमज 1: शेअर बाजारात गुंतवणूक करणं म्हणजे जुगार खेळण्यासारखं आहे


अनेकदा आपल्या पालकांपैकी किंवा आपल्याला सांगण्यात आलेल्या शेअर बाजारात सगळे पैसे घालवून बसलेल्या कोणाचं न कोणाचं उदाहरण असतंच. शेअर मार्केट खाली गेलं की पैसे टाकायचे आणि मार्केट वर गेलं की पैसे काढून घ्यायचे, एवढंच गणित अनेकांना माहित आहे. पण यापलीकडेही असे अनेकजण आहेत, जे विचारपूर्वक एखाद्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवतात आणि चांगल्या परताव्यासह संपत्ती कमवतात.
अनेक शेअर मार्केटमधील तज्ञ सांगतात, गुंतवणूक हा एक दीर्घकालीन खेळ आहे ज्यामध्ये गुंतवणूकदारांना वेळोवेळी ते चिकटवून ठेवण्याचा बहुधा फायदा होतो." या साठी कोणतातरी मार्गदर्शन करणारा आर्थिक सल्लागार असला तरी मदत होऊ शकते.


गैरसमज 2: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास खूप वेळ द्यावा लागतो..


अनेकदा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास टाळण्यामागे या गुंतवणूकीला फार वेळ द्यावा लागतो, हे कारण सांगितले जाते. अनेक दिग्गज गुंतवणूकदार सांगतात शेअर मार्केटमध्ये पैसे कधी टाकायचे आणि कधी काढायचे ही वेळ ठरवणे अतिशय कठीण काम आहे. दैनंदिन बातम्यांमुळे अनेकांचा गोंधळ उडतो. त्यामुळे एखाद्या कंपनीचा ५ ते ७ वर्षांचा ग्राफ पाहून गुंतवणूक केली तर मार्केट खाली गेले तरी मुसंडी मारून ते वरही तितक्याच लवकर येते. त्यामुळं दररोजच्या बातम्यांच्या चक्रात न गुरफटण्याचा सल्ला तज्ञ देतात.


गैरसमज 3: शेअर मार्केटची गुंतवणूक श्रीमंतांसाठी असते


शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणं हे श्रीमंतांचे चोचले आहेत, असा उपहास आपण अनेकदा ऐकला असेल. पण यात रिस्क असली तरी विचारपूर्वक पैसे गुंतवले तर सामान्य गुंतवणूकीच्या तुलनेत फायदाही अधिक होतो. आपल्या पगारातील ३० टक्के रक्कम ही गुंतवणूकीसाठी वापरण्याचा सल्ला अनेकजण देतात. आपल्या भविष्याची तरतूद पारंपरिक गुंतवणीहून अधिकही मिळू शकते.


गैरसमज 4: टक्केवारी नफा आणि टक्केवारी तोटा समतुल्य आहेत


वेळोवेळी टक्केवारीतील नफा आणि तोटा समजून घेणे गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे आहे. कारण ते त्यांना त्यांचा परताव्याचा दर किंवा विशिष्ट कालावधीत त्यांचा निव्वळ नफा किंवा तोटा निर्धारित करण्यात मदत करते. जेव्हा तुम्ही गणित करता तेव्हा ते समतुल्य असतात असा विचार करणे हे आव्हान आहे.


गैरसमज 5: वर गेलेले शेअर खाली येतातच


भौतिकशास्त्राचे नियम शेअर बाजाराला लागू होत नाहीत, आणि समभाग परत खेचण्यासाठी गुरुत्वाकर्षण शक्ती नाही. २० वर्षांपूर्वी बर्कशायर हॅथवेच्या शेअरची किंमत पाच वर्षात 7455 डॉलरवरून १७२५० डॉलरवर गेली होती. त्यामुळं स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी त्या कंपनीचा पूर्ण अभ्यास करूनच गुंतवण्याचा सल्ला तज्ञ देतात.


गुंतवणूकदारानं होमवर्क करणं गरजेचंय


काहीतरी जाणून घेणे सामान्यत: काहीही न करण्यापेक्षा चांगले असते, परंतु शेअर बाजारात हे महत्त्वाचे आहे की वैयक्तिक गुंतवणूकदारांना ते त्यांच्या पैशाचे काय करत आहेत याची स्पष्ट समज असणे आवश्यक आहे. जे गुंतवणूकदार त्यांचा गृहपाठ करतात तेच यशस्वी होतात. ज्या गुंतवणूकदाराकडे विस्तृत संशोधन करण्यासाठी वेळ नाही त्यांनी सल्लागाराच्या सेवा घेण्याचा विचार केला पाहिजे.