Business Idea: अलिकडच्या काळात अनेक तरुण व्यवसायांकडे (Business) जात असल्याचे चित्र दिसत आहे. वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून तरुण चांगला नफा मिळवत आहेत. तुम्हाला देखील व्यवसाय सुरु करायची इच्छा असेल तर करु शकता. कमी खर्चात चांगला नफा मिळवून देण्याऱ्या व्यवसायासंदर्भातील माहिती आज आपण पाहणार आहोत.  


तुम्ही सुरुवातीला कमी भांडवलाची गुंतवणूक करुन टी-शर्ट प्रिंटिंग (T-shirt Printing) व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय तुम्ही कमी गुंतवणुकीत सुरु करु शखता. योग्य नियोजन करुन जर हा व्यवसाया सुरु केला तर अतिशय फायदेशीर हा व्यवसाय आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी काय आवश्यक आहे, किती खर्च येईल, किती नफा मिळू शकेल आणि किती जागा लागेल याबाबतची माहिती जाणून घेऊयात. 


 टी-शर्ट प्रिंटिंग व्यवसाय सुरु करण्यासाठी किती जागा लागेल?


टी-शर्ट प्रिंटिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला मोठ्या जागेची गरज नाही. याची सुरुवात तुम्ही घरुनही करू शकता. यासाठी किमान 100 ते 150 चौरस फूट एवढी लहान खोली आवश्यक आहे. यामध्ये तुम्हाला प्रिंटिंग मशीन, प्लेन टी-शर्ट आणि इतर काही गोष्टी लागतील. तुमच्या घरात छोटी खोली किंवा ऑफिसची जागा असेल तर तुम्ही ती या व्यवसायासाठी वापरु शकता. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर काम करायचे असेल तर 200 ते 300 चौरस फूट जागेची आवश्यकता असू शकते. आपल्याकडे पॅकिंग आणि शिपिंगसाठी जागा देखील असणे आवश्यक आहे.


तु्म्हाला या व्यवसायासाठी किती पैसे गुंतवावे लागतील?


टी-शर्ट प्रिंटिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी, काही विशेष साधनांची आवश्यकता असते. यामध्ये हीट प्रिंटिंग मशीन खरेदी करावं लागेल. याची किंमत 15,000 ते  40,000 रुपये आहे. तसेच तुम्ही जर मोठ्या प्रमाणात टी-शर्ट खरेदी केल्यास तुम्हाला प्रत्येक टी-शर्टवर सुमारे 100 ते 200 रुपये खर्च करावे लागतील. या व्यतिरिक्त, तुम्हाला एक डिझाइन सॉफ्टवेअर देखील आवश्यक असेल, ज्यासाठी तुम्हाला सुमारे  2000 ते 5,000 रुपये खर्च करावे लागतील. छपाईतील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाई. तुम्हाला शाईसाठी 3000 ते 10,000 खर्च करावे लागतील. शाई दर्जेदार असल्याची खात्री करा, अन्यथा ग्राहकांच्या तक्रारी उद्भवू शकतात.


सुरुवातीला 50 ते 70 हजार रुपये गुंतवावे लागतील


तुम्हाला हा व्यवसाय सुरु करण्यासाठी ट्रान्सफर प्रिंटिंग पेपर देखील आवश्यक आहे. ज्यासह आपण कोणत्याही टी-शर्टवर मुद्रित करू शकता. यासाठी तुम्हाला 1000 ते 5000 खर्च करावे लागतील. तुम्हाला पॅकेजिंग मटेरियलवर 2000 ते 5000 खर्च करावे लागतील. अशाप्रकारे, सुरुवातीला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 50 ते 70 हजार रुपये गुंतवावे लागतील.


या व्यवसायातून किती नफा होईल?


टी-शर्ट प्रिंटिंगमधील नफा डिझाइन, गुणवत्ता आणि विपणन यासारख्या अनेक घटकांवर अवलंबून असतो. तुम्हाला 100 ते 200 मध्ये टी-शर्ट मिळेल. छपाईसाठी शाई, कागद आणि मशीनची किंमतही सुमारे 50-ते 100 रुपये येईल. अशा प्रकारे तुमची एकूण किंमत 150 ते 300 रुपये प्रति टी-शर्ट होईल. आता जर तुम्ही 300 ते 600 रुपयांमध्ये टी-शर्ट विकू शकत असाल, तर तुम्हाला प्रत्येक टी-शर्टवर 150-300 रुपयांचा नफा होईल. अशा प्रकारे, जर तुम्ही एका महिन्यात 1000 टी-शर्ट विकले तर तुम्हाला दरमहा 1.5 लाख ते 3 लाख रुपये सहज नफा होऊ शकतो.


मार्केटिंगकडे लक्ष देणं गरजेचं


टी-शर्ट प्रिंटिंग व्यवसाय यशस्वी करण्यासाठी, तुम्हाला चांगल्या डिझाइनसह आणि प्रभावीपणे मार्केटिंग करावे लागेल तुमच्या उत्पादनाचे जितके चांगले मार्केटिंग करू शकता, तितके जास्त ग्राहक तुम्ही चांगल्या किमतीत आकर्षित करू शकाल. तसेच तुम्ही तुमची उत्पादने Amazon, Flipkart, Meesho इत्यादी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकू शकता. याशिवाय, तुम्ही तुमच्या डिझाईन्स आणि उत्पादनांचा इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲप सारख्या प्लॅटफॉर्मवर प्रचार करू शकता आणि तिथून ऑर्डर मिळवू शकता. या व्यतिरिक्त, तुम्ही तुमची स्वतःची वेबसाइट तयार करू शकता, जिथे तुम्ही तुमच्या उत्पादनांची यादी करून तुमचा व्यवसाय वाढवू शकता. एवढेच नाही तर तुम्ही जवळपासच्या कॉलेजेस, ऑफिसेस आणि इव्हेंट्समध्ये कस्टम टी-शर्ट्सची जाहिरात देखील करू शकता, ज्यामुळे तुम्हाला मोठा नफा मिळेल.