Health Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज (1 फेब्रुवारी 2025) आपला आठवा तर मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प 2025-26 (Union Budget 2025) संसदेत सादर केला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी आरोग्य अर्थसंकल्पाबाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत. यात रुग्णांना, विशेषतः कर्करोग आणि दुर्मिळ आजारांनी ग्रस्त असलेल्यांना मदत करण्यासाठी 36 जीवनरक्षक औषधांना मूलभूत सीमाशुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.


या सोबतच कॅन्सर हॉस्पिटलमध्ये डे-केअर सुरू करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन सांगितले. जेणेकरून कर्करोगाच्या रुग्णांना विशेष काळजी घेता येईल. कॅन्सर हा इतका घातक आणि प्राणघातक आजार आहे. परिणामी हा रोग रुग्ण आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिक, मानसिक आणि शारीरिक अशा सर्वच बाजूंनी हानी पोहोचवतो. मात्र आता सरकारतर्फे कॅन्सर हॉस्पिटलमध्ये डे-केअर सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ज्याद्वारे रुग्णाला आणि त्याच्या कुटुंबीयांना उपचारासोबतच मानसिक आधार आणि व्यावहारिक मदतही दिली जाईल. त्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांना जलद पुनर्प्राप्त करण्यात मदत करू शकते आणि वेळ आणि पैसा वाचवू शकते.


डे-केअर म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते?


डे केअर सेंटर्स केमोथेरपी इन्फ्युजन सुविधा देतात. जे प्रायव्हेट लाउंज किंवा कॉमन एरियामध्ये दिले जाऊ शकते. डे केअर सेंटर्स रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कर्करोगाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी समुपदेशन आणि इतर सहाय्य प्रदान करतात. डे केअर सेंटर्स रुग्णांना साइड इफेक्ट्स व्यवस्थापित करण्यात मदत करू शकतात आणि मसाज किंवा एक्यूपंक्चर सारखे वैद्यकीय सहाय्य प्रदान करू शकतात.


बजेट 2025-26 मधील महत्त्वाचे आरोग्यविषयक निर्णय


• गंभीर आजारांवरील 36 जीवनरक्षक औषधांवर पूर्णतः शुल्क माफी
• सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये कॅन्सर डे-केअर केंद्रे स्थापन केली जाणार
• कॅन्सर उपचारासाठी आवश्यक औषधे स्वस्त होतील
• 6 जीवनरक्षक औषधांवर कस्टम ड्युटी 5% करण्यात येणार


आरोग्य आणि ऊर्जा क्षेत्रातील निर्णय


• २०० डे-केअर कॅन्सर केंद्रे उघडणार
• नव्या योजनांसाठी ₹१० लाख कोटी गुंतवणूक
• जल जीवन मिशन २०२८ पर्यंत वाढवण्यात आले
• न्युक्लिअर एनर्जी मिशन
o खासगी क्षेत्रासोबत भागीदारी
o १०० गिगावॉट न्युक्लिअर एनर्जी निर्मितीचे लक्ष्य (२०४७ पर्यंत)
o अणू क्षेत्रात संशोधन आणि विकाससाठी 20 हजार कोटींची तरतूद 
o स्वदेशी बनावटींनी तयार केलेल्या अणू भट्ट्यांसाठी वीस हजार कोटी 
o २०३३ पर्यंत अणुभट्ट्या कार्यरत होणार


इतर महत्वाच्या बातम्या