Union Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) शनिवारी आठवा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी एमबीबीएसच्या (MBBS) जागा वाढवण्याची घोषणा केली आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या अर्थसंकल्पामध्ये  वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पुढील वर्षापासून मेडिकल कॉलेजमध्ये (MBBS) 75 हजार जागा वाढवण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी अर्थसंकल्पात केली आहे. आयआयटीच्या 6500 जागा वाढवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सरकारने जागा वाढवल्या आहेत. पुढील वर्षी 10 हजार अतिरिक्त जागा वाढवण्यात येणार आहेत. येत्या पाच वर्षांत 75 हजार जागा वाढणार आहेत. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात कॅन्सर सेंटर असावेत यासाठी आमचे सरकार प्रयत्न असल्याचेही अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे.


आयआयटीची क्षमता वाढल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. 5 IIT मध्ये अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. तसेच आयआयटी पटनाचा विस्तार करण्यात येणार आहे. त्याचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांना मिळू शकेल. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातही गुंतवणूक केली जाणार आहे. सरकारने यासंदर्भातील जागा देखील वाढवल्या आहेत. पुढील वर्षी 10 हजार अतिरिक्त जागा वाढवण्यात येणार आहेत.


या अर्थसंकल्पात देशातील एमबीबीएसच्या जागा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे एमबीबीएसमध्ये प्रवेश घेणे सोपे होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. येत्या पाच वर्षांत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या जागा वाढवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी अर्थसंकल्पात दिली. त्यामुळे डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना संधी मिळणार आहे.


भारतातील MBBS जागांची सद्यस्थिती


देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सध्या एमबीबीएसच्या एकूण 1,12,112 जागा उपलब्ध आहेत, ज्यासाठी दरवर्षी प्रवेशासाठी स्पर्धा असते. या जागांसाठी NEET परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. 2014 पर्यंत, एकूण एमबीबीएसच्या जागा 51,348 होत्या, तर त्या वेळी देशात फक्त 387 वैद्यकीय महाविद्यालये होती. जुलै 2024 पर्यंतच्या आकडेवारीनुसार आता देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 731 वर पोहोचली आहे.



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI