Budget 2023: लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प (Budget 2023) अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी सादर केला.  मोदी सरकारकडून आदिवासी विकास मिशनची घोषणा करण्यात आली आहे.   आदिवासी विकास मिशनअंतर्गत एकलव्य मॉडेल (eklavya yojana)  निवासी शाळांसाठी  38 हजार  शिक्षकांची नियुक्ती होणार आहे.  परंतु निवासी शाळेसाठी राबवण्यात येणारी एकलव्य योजना काय आहे हे आपण जाणून घेऊया


देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देशातील गरीब, आदिवासी, मागास, भटके या वंचित वर्गाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना सुरू केल्या. गरीब, आदिवासी, मागास व भटक्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी ही योजना करण्यात आला आहे. एकलव्य मॉडेल शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर काही महाविद्यालये, विद्यापीठांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केल्या आहेत. या योजनेचा राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना उपयोग होत आहे. या योजनेमुळे या वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना फायदा होतो.


आदिवासी विकास मिशनची घोषणा


भारतीय अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून आदिवासी विकास मिशनची (Adivasi Vikas Mission)  घोषणा करण्यात आली आहे.  शिक्षकांची नियुक्ती आदिवासी विकास  मिशनअंतर्गत होणार आहे. आदिवासींसाठी विशेष शाळा उघडल्या जाणार आहेत. तर आदिवासींसाठी 15 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.  तर  एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी 38 हजार शिक्षकांची भरती होणार आहे.  याचा फायदा साडेतीन लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे.  740 शाळांना याचा फायदा होणार आहे. 


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आज अर्थसंकल्प मांडला. येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा आज शेवटचा संपूर्ण अर्थसंकल्प आहे. मोदी सरकारचा हा एकूण नववा अर्थसंकल्प आहे.  आगामी लोकसभा निवडणुकीचा तसेच या वर्षात आठ ते दहा राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यंदाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी 1 तास 25 मिनिटांचे भाषण केले. अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत.  सीतारमण यांच आतापर्यंतच सर्वात छोटं अर्थसंकल्पीय भाषण आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


New Tax Regime : जुनी कर प्रणाली रद्द, नव्या कर प्रणालीमध्येही मिळणार 80C गुंतवणूक, गृह कर्ज या सवलती!