Budget 2022 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा चौथा अर्थसंकल्प सादर केला. आज अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. काही क्षेत्रांना दिलासा देण्यात आला आहे. तर काही क्षेत्रांची निराशा झाली आहे. अर्थसंकल्पातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, करदात्यांची निराशा झाली आहे. इनकम टॅक्स स्लॅबमध्ये यंदाच्या अर्थसंकल्पात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जाणून घेऊया की, यावेळच्या अर्थसंकल्पात कोणत्या वस्तूंचे दर कमी होणार आणि कोणत्या वस्तूंचे दर वाढणार आहेत. त्याबाबत...
स्वस्त झालेल्या गोष्टी :
- परदेशातून येणाऱ्या मशिन्स स्वस्त होतील
- कापड आणि चामड्याच्या वस्तू स्वस्त होतील
- शेतीची अवजारं स्वस्त होतील
- मोबाईल - चार्जर
- शूज - चपला
- हिऱ्याचे दागिने
महाग झालेल्या गोष्टी :
छत्री
अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा :
- आरबीआयचे डिजिटल चलन
- चिप असलेले पासपोर्ट
- ईलेक्ट्रिक वाहन बॅटरी अदलाबदली धोरण
- देशात 60 लाख नव्या नोकऱ्या
- पोस्टात कोअर बँकिंग सुविधा
- रसायन, कीटनाशकमुक्त शेतीला प्राधान्य
- संरक्षण क्षेत्र संशोधनासाठी 25 टक्के बजेट
- शालेय शिक्षणासाठी 100 टीव्ही वाहिन्या
- 2022 मध्ये 5 जी सेवा सुरु करणार
- 3.8 कोटी घरांमध्ये नळाचं पाणी
- मालमत्ता नोंदणी कुठूनही करण्याची सुविधा
- क्रिप्टो करन्सी कमाईवर 30 टक्के कर
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- No Change in Tax Slabs: महत्त्वाची बातमी! कर रचना 'जैसे थे', कोणताही बदल नाही; अर्थमंत्र्यांची घोषणा
- Income Tax: आयकर रिटर्न भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दोन वर्षांपूर्वीच्या चुका सुधारण्याची संधी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha