मुंबई : अर्थमंत्री निर्माला सिमारामन (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024) गुरुवार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर करण्यात आला. तसेच यावेळी रेल्वेच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला  15 हजार 554 कोटी  रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी दिली. मागील वर्षी महाराष्ट्रात रेल्वेसाठी 13 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. 


अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील रेल्वे मार्गिकेला घसघसशीत निधी आल्याचं चित्र आहे. नवी रेल्वे मार्गिका, दुसरी, तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका यासाठी देखील निधी दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे कसारा,कर्जत आणि पुणे या रेल्वेयार्डाचं नुतनीकरण केलं जाईल. सीएसएमटी, एलटीटीच्या विकासाठी देखील निधी दिला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. नेमकं महाराष्ट्राला रेल्वेच्या बजेटमध्ये काय मिळालं याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 



देशाच्या अंतरिम बजेटमधून महाराष्ट्रात रेल्वेला काय मिळालं?


महाराष्ट्रातील एकूण सहा नवीन मार्गिकांसाठी तरतूद करण्यात आलीये. त्यासाठी जवळपास 1 हजार 940 कोटी रुपयांची तरतूद असणार आहे. तसेच यामध्ये दुसरी, तिसरी आणि चौथी मार्गिका या प्रकल्पांसाठी देखील अर्थसंकल्पात कोट्यावधी रुपयांची तरतूद झालीये. या प्रकल्पांसाठी जवळपास 1,610 तरतूद असणार आहे. तसेच यामध्ये सीएसएमटी म्हणजे छत्रपची शिवाजी महाराज टर्मिनस आणि एलएलटी या स्थानकांच्या विकासकामांसाठी तरतदू आहे. 


नवीन रेल्वे मार्गिका
नगर बीड परळी रेल्वे मार्ग -  275 कोटी
बारामती लोणंद रेल्वे मार्ग - 330 कोटी
वर्धा नांदेड रेल्वे मार्ग - 750 कोटी
सोलापूर उस्मानाबाद तुळजापूर रेल्वे मार्ग - 225 कोटी
धुळे नार्धना रेल्वे मार्ग - 350 कोटी
कल्याण मुरबाड बारस्ता उल्हासनगर रेल्वे मार्ग - 10 कोटी


दुसरी, तिसरी आणि चौथी मार्गिका प्रकल्प
कल्याण कसारा तिसरी मार्गिका - 85 कोटी
वर्धा नागपूर रेल्वे तिसरी मार्गिका - 125 कोटी
वर्धा बल्लार शाहा तिसरी मार्गिका - 200 कोटी
इटारसी नागपूर तिसरी मार्गिका - 320 कोटी
पुणे मिरज रेल्वे दुसरी मार्गिका - 200 कोटी
दौंड मनमाड दुसरी मार्गिका - 300 कोटी
वर्धा नागपूर 4 थी मार्गिका -  120 कोटी
मनमाड जळगाव तिसरी मार्गिका - 120 कोटी
जळगाव भुसावळ चौथी मार्गिका - 40 कोटी
भुसावळ वर्धा तिसरी मार्गिका - 100 कोटी


गेज रूपांतर
पाचोरा जामनेर मार्गासाठी - 300 कोटी


यार्ड remodeling
कसारा - 1 कोटी
कर्जत - 10 कोटी
पुणे - 25 कोटी


सीएसएमटी साठी प्लॅटफॉर्म लांबीकरण - 10 कोटी 
एलटीटी स्थानक - 2 कोटी


यामुळे आता महाराष्ट्रातील रेल्वेला गती मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये रेल्वेत कोणत्या सुधारणा होतील याकडे लक्ष लागून राहिल. 


ही बातमी वाचा : 


Defence Budget 2024 : देशाच्या संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद, जाणून घ्या जीडीपीच्या किती टक्के होणार खर्च