Income Tax 2025, New Tax Regime नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मध्यमवर्गाला दिलासा देत नव्या कररचनेत 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करत असल्याची घोषणा केली. नव्या कररचनेत अर्थमंत्री यांनी फेरबदल जाहीर केले. तर, निर्मला सीतारामन यांनी नवं आयकर विधेयक येत्या आठवड्यात आणणार असल्याचं म्हटलं.
नव्या कररचनेतील बदल आणि फायदे
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात नव्या कररचनेतील फेरबदल जाहीर केले. नव्या कररचनेत 0 ते 4 लाखांपर्यंत कोणताही कर नसेल. 4 ते 8 लाखांपर्यंत 5 टक्के करण्यात आली आहे. 8 ते 12 लाख रुपयांपर्यंत 10 टक्के प्राप्तिकर आकारला जाईल. 12 लाख ते 16 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 15 टक्के प्राप्तिकर आकारला जाईल. 16 ते 20 लाख उत्पन्न असेल त्यांना 20 टक्के प्राप्तिकर द्यावा लागेल. तर, 20 लाख ते 24 लाख रुपयांचं उत्पन्न ज्यांचं असेल त्यांना 25 टक्के कर द्यावा लागेल. 24 लाखांपेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न असेल त्यांना 30 टक्के कर द्यावा लागेल.
नव्या कररचनेनुसार ज्यांचं उत्पन्न 8 लाखांपर्यंत असेल त्यांना 30 हजारांचा फायदा होईल. 9 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असेल त्यांना 40 हजारांपर्यंत लाभ होईल. 10 लाख ज्याचं उत्पन्न असेल त्यांना 50 हजार रुपये, 11 लाख रुपये ज्याचं उत्पन्न असेल त्यांना 65 हजार, 12 लाख रुपये उत्पन्न असेल त्यांना 80 हजराचांचा फायदा होईल.16 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना 50 हजार, 20 लाख रुपये उत्पन्न असेल त्यांना 90 हजार रुपये, 24 लाखांचं उत्पन्न असेल त्यांना वार्षिक 1, 10,000 हजारांचा फायदा होईल.
जुन्या कररचनेचे दर
जुन्या कररचनेत अडीच लाख रुपयांपर्यतचं उत्पन्न करमुक्त आहे. 2.5 ते 5 लाखांपर्यंत 5 टक्के कर द्यावा लागेल. 5 ते 10 लाख रुपये उत्पन्नापर्यंत 20 टक्के कर लागतो. 10 ते 15 लाखा रुपये उत्पन्न असेल त्यांना 30 टक्के कर द्यावा लागतो. 15 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असेल त्यांना 30 टक्के कर जुन्या कररचनेप्रमाणे द्यावे लागतील.
आर्थिक क्षेत्रातील जाणकारांनी 12 लाख रुपयांपर्यंत करमुक्त उत्पन्न ही अविश्वसनीय करमुक्त मर्यादा असल्याचं म्हटलंय. 12 लाखांपर्यंत कर लागेल मात्र रिबेट मिळेल, त्यामुळं कर भरावं लागेल. कॅपिटल गेन आहे त्यावरील कर भरावा लागेल. मात्र, 12 लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर नोकरदारांना 80 हजारांचा फायदा होईल. नव्या कररचनेत 12 लाख रुपयांपर्यंत करमुक्त उत्पन्न केल्यानं जुन्या कररचनेतून नव्या कररचनेत स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या वाढेल.
इतर बातम्या :