Union Budget 2022 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नॅशनल पेन्शन सिस्टिम (NPS) मध्ये कर सवलतीची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने NPS मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या गुंतवणुकीवरील कपात 10 टक्क्यांवरून 14 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना NPS मधील गुंतवणुकीवर 14% पर्यंत कर सवलत मिळते, तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 10% मिळते. आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही 14 टक्के कर सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


एनपीएसबाबत काय घोषणा?


सध्या केंद्र सरकार राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) टियर-I प्रदान करत आहे. ते आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 14 टक्के योगदान देते. तथापि, राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या बाबतीत, पगाराच्या 10 टक्के मर्यादेपर्यंत अशी कपात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचार्‍यांना समान वागणूक देण्यासाठी, राज्य सरकारी कर्मचार्‍यांसाठी देखील एनपीएस खात्यातील नियोक्त्याच्या योगदानावर कर कपातीची मर्यादा 10 टक्क्यांवरून 14 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याचं निर्मला सीतारमण म्हणाल्या. यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सोशल सिक्युरिटीजचे फायदे वाढण्यास आणि त्यांना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने आणण्यास मदत होईल.


NPS मधील नियुक्त्यांच्या (एम्प्लॉयर) योगदानाची वजावट केंद्र सरकारी कर्मचार्‍यांच्या बरोबरीने राज्य सरकारी कर्मचार्‍यांसाठी 10% वरून 14% पर्यंत वाढली आहे, परंतु गैर-सरकारी कर्मचार्‍यांसाठी नाही. हे पाऊल राज्य आणि केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये समानता आणण्यासाठी आणि सामाजिक सुरक्षा फायदे वाढवण्यासाठी आहे. पुढे जाऊन, राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या NPS खात्यात दिलेले योगदान देखील 10 टक्क्यांऐवजी 14 टक्के असेल अशी प्रतिक्रिया डेलॉयट इंडियाच्या भागीदार सरस्वती कस्तुरीरंगन यांनी दिली आहे


NPS म्हणजे काय?


NPS ही योजना 2004 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि पूर्वी फक्त सरकारी कर्मचारीच यामध्ये गुंतवणूक करू शकत होते. परंतु 2009 मध्ये ती सर्वांसाठी खुली करण्यात आली. या योजनेंतर्गत, सेवानिवृत्तीपर्यंत योगदान दिले जाते आणि नंतर सेवानिवृत्तीच्या वेळी म्हणजेच वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर जमा झालेल्या रकमेचा काही भाग काढता येतो आणि उर्वरित रक्कम नियमित पेन्शन म्हणून मिळवता येते.


हे ही वाचा -



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live