मुंबई: आज 2024 च्या निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प (Budget 2024) संसदेत सादर झाला आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अनेक घोषणा केल्या. पण या अर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर (Share Market) मात्र सकारात्मक परिणाम झाल्याचं दिसून आलं नाही. शेअर बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये चांगली वाढ दिसून आली, परंतु अर्थसंकल्पीय भाषण संपल्यानंतर बाजारात काहीशी घसरण झाल्याचं दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांत सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये आज काहीशी घसरण झाली. 


मार्केट ओपनिंग कसे होते?


आज शेअर बाजार बंद होताना बीएसई सेन्सेक्स 106.81 अंकांनी म्हणजे 0.15 टक्क्यांनी घसरला आणि 71,645 च्या पातळीवर व्यापार बंद झाला. NSE चा निफ्टी 28.25 अंकांच्या म्हणजेच 0.13 टक्क्यांच्या घसरणीसह 21,697 च्या पातळीवर बंद झाला.


सेन्सेक्स-निफ्टी समभागांची स्थिती


सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी केवळ 10 समभाग वाढीसह बंद झाले आणि 20 समभाग तोट्यासह बंद झाले. त्याच वेळी, NSE निफ्टीच्या 50 पैकी 19 शेअर्स वाढीसह आणि 31 शेअर्स घसरणीसह बंद झाले.


बीएसईच्या मार्केट कॅपमध्ये फारसा बदल नाही


BSE च्या मार्केट कॅपमध्ये फारसा बदल झालेला नाही आणि तो एकूण रु. 3,79,43,813.20 कोटी म्हणजेच 379.43 लाख कोटींवर आला आहे. आजच्या व्यापारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत थोडीशी घट झाली आहे. बुधवारच्या बंदच्या वेळी बीएसईचे मार्केट कॅप जवळपास विक्रमी उच्चांकावर पोहोचले होते. शेअर बाजारातील तेजीमुळे बुधवारी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी उसळी पाहायला मिळाली. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 379.57 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर बंद झाले आहे, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात (मंगळवार) 375.38 लाख कोटी रुपये होते.


अर्थसंकल्पानंतर पीएसयू बँकेचे शेअर्स वाढले, रेल्वेचे शेअर घसरले


अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर, PSU बँकांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे आणि बँक निफ्टीचे सर्व बँक PSU शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले आहेत. याशिवाय काही दिवस वरच्या श्रेणीत फिरणारा रेल्वेचा साठा आज लालफितीत घसरत बंद झाला.


काय म्हणाल्या निर्मला सीतारमण? 


गेल्या 10 वर्षात आम्ही जे काम केलंय त्याच्या भरवशावर देशाची जनता आम्हाला पुन्हा संधी मिळेल, देशातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरापर्यंत सुविधा कशी मिळेल याबद्दल आम्ही प्रयत्न केले असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित बनवण्य़ाचा आम्हचा प्रयत्न असून त्या दृष्टीने गेल्या 10 वर्षांपासून प्रयत्न सुरू केलेत. देशातील 25 कोटी जनतेला आम्ही गरिबीच्या खाईतून बाहेर काढण्यास आम्ही यशस्वी ठरलो आहोत असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं


ही बातमी वाचा: 



  • Union Budget 2024 : रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म या सूत्रावर देशाचा विकास करणार, बजेटमधील A To Z घोषणा