नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी विविध मोठ्या मोठ्या घोषणा केल्या आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पातून पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडू या राज्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहे. निवडणुका होणाऱ्या या राज्यामध्ये इकनॉमिक कॉरिडोअर उभारण्याची घोषणा केली असून यासाठी तब्बल 2.27 लाख कोटींची दिले आहेत.  तामिळनाडूपेक्षा पश्चिम बंगालला झुकते माप देण्यात आले आहे.


अर्थमंत्री म्हणाल्या, पश्चिम बंगालमध्ये कोलकात-सिलीगुडी हा नॅशनल हायवे प्रोजेक्ट होणार आहे. बंगालमध्ये होणाऱ्या राजमार्गासाठी 25,000 कोटी रूपये देण्यात आले आहे. त्याचबरोबर केरळ, आसाम आणि तामिळनाडूसाठी मोठ्या घोषणा केल्या आहे. तामिळनाडूमध्ये होणाऱ्या नॅशनल हायवेसाठी 1.03 लाख कोटी रूपये खर्च होणार आहे. याचे बांधकाम पुढील वर्षी सुरू होणार आहे. याचबरोबर मुंबई- कन्याकुमारी हा कॉरीडॉरदेखील बनणार आहे. केरळमध्ये हायवेसाठी 65 हजार कोटी रूपये खर्च होणार आहे. 34 हजार कोटी रूपये आसाममधील नॅशनल हायवे होणार आहे. अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान दोन गोष्टींचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होतो. पहिला आयकर स्लॅबबाबत बजेटची घोषणा आणि बजेटमुळे काय स्वस्त आणि महाग झालं आहे. यंदाच्या बजेटमध्ये काय स्वस्त आणि काय महाग झालं पाहुयात.


काय महाग झालं?


मोबाईल फोन आणि मोबाइल फोनचे भाग, चार्जर्स.
गाड्याचे स्पेअर पार्ट्स
इलेक्ट्रॉनिक उपकरणे
इम्पोर्टेड कपडे
सोलार इन्व्हर्टर, सौर उपकरणे
कापूस


काय स्वस्त झालं?


पोलादी वस्तू
सोने
चांदी
तांबे साहित्य
लेदरच्या वस्तू


संबंधित बातम्या

Union Budget 2021 | अर्थ बजेटचा | तज्ज्ञांकडून अर्थसंकल्पाचं खास विश्लेषण