Rishi Sunak Net Worth News : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या संपत्तीत मोठी वाढ (increase in wealth) झालीय. ब्रिटनच्या राजापेक्षा जास्त संपत्ती ऋषी सुनक यांची झाली आहे. वर्षभरात त्यांची संपत्ती 1287 कोटी रुपये झाली आहे. संडे टाइम्समध्ये (Sunday Times) याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे. 


 ऋषी सुनक यांची एकूण संपत्ती किती?


संडे टाइम्सने श्रीमंतांची नवीन यादी प्रसिद्ध केलीय. यामध्ये  ऋषी सुनक यांच्या संपत्तीबाबतची माहिती देण्यात आलीय. श्रीमंतांच्या यादीत ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती अग्रेसर आहेत. त्यांच्या संपत्तीत गेल्या वर्षी 122 दशलक्ष पौंडची (1287 कोटी रुपये) वाढ झाली आहे. नवीन यादीमध्ये, त्यांची अंदाजे निव्वळ संपत्ती 2023 मध्ये 529 दशलक्ष पौंडवरुन 651 दशलक्ष पौंड म्हणजे 6867 कोटी रुपये झाली आहे.


वर्षभरात संपत्तीत 1287 कोटी रुपयांची वाढ 


दरम्यान, वर्षभरात संपत्तीत झालेल्या वाढीमुळं ऋषी सुनक यांनी श्रीमंतांच्या यादीत वरचे स्थान मिळवले आहे. वर्षभरात त्यांची संपत्ती 1287 कोटी रुपयांनी वाढली आहे. संपत्तीच्या या वाढीमुळं ऋषी सुनक हे राजा चार्ल्स तिसरे यांच्यापेक्षा श्रीमंत झाले आहेत. ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या संडे टाइम्सच्या वार्षिक यादीनुसार, चार्ल्स तिसरा हे गेल्या वर्षी सुनक कुटुंबापेक्षा वरचे स्थान होते. परंतु वैयक्तिक संपत्तीमध्ये गेल्या वर्षी थोडीशी वाढ दिसून आली होती. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये, ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांची संपत्ती दिवंगत राणीपेक्षा अधिक श्रीमंत झाली होती. गेल्या 35 वर्षांच्या इतिहासात संडे टाइम्सच्या वार्षिक संपत्ती यादीत समाविष्ट होणारे सुनक हे पहिले आघाडीचे राजकारणी ठरले आहेत. 


कशी वाढली ऋषी सुनक यांची संपत्ती


ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नीच्या संपत्तीत झालेली वाढ मूर्ती यांच्या इन्फोसिसमधील स्टेकशी जोडलेली आहे. Infosys ही 70 अब्ज डॉलरची भारतीय IT कंपनी आहे. ज्याची सह-स्थापना अक्षता मूर्तीचे वडील नारायण मूर्ती आहेत. अक्षता मूर्तींचाही त्यामध्ये हिस्सा आहे. गेल्या वर्षभरात इन्फोसिसमधील अक्षता मूर्तीच्या शेअर्सचे मूल्य £108.8 दशलक्षने वाढून जवळपास £590 दशलक्ष झाले आहे. दरम्यान, संडे टाइम्सच्या वार्षिक यादीत दिलेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये ब्रिटिश अब्जाधीशांच्या संख्येत सलग दुसऱ्या वर्षी घट झाली आहे. यूकेमध्ये 2022 मध्ये 177 अब्जाधीश होते, जे गेल्या वर्षी 171 पर्यंत घसरले आणि यावर्षी पुन्हा 165 वर आले.


महत्वाच्या बातम्या:


PM Rishi Sunak : पीएम ऋषी सुनक यांचा दे धक्का! 4 हजार भारतीय नर्सेसना इंग्लंड सोडावा लागणार! लाखो रुपये पाण्यात