Agriculture News : केंद्र आणि विविध राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ दिलं जातं. अशातच आता बिहार सरकारने (Bihar Govt) शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकरी बांधवांना पॉलीहाऊस (Polytunnel) उभारण्यासाठी अनुदान मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना नेमकं काय करावं लागेल? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.


बिहार सरकारने शेतकऱ्यांना पॉलीहाऊस आणि शेड नेटद्वारे शेती करण्यासाठी सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या पावलामुळं शेतकरी बांधवांचे उत्पन्न तर वाढेलच पण उत्पादनातही वाढ होईल. त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधव horticulture.bihar.gov.in या अधिकृत साइटला भेट देऊन नोंदणी करू शकतात. बिहारच्या फलोत्पादन विभागाने शेअर केलेल्या पोस्टनुसार, शेतकऱ्यांना पॉलीहाऊस आणि शेड नेट अंतर्गत चांगले फायदे मिळतील. या माध्यमातून शेतकऱ्यांना शासनाकडून शेतीसाठी 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. पोस्टनुसार, शेतकरी बांधवांना शेड नेट बसवण्यासाठी प्रति चौरस मीटर 935 रुपये आणि शेड नेटसाठी 710 रुपये प्रति स्क्वेअर मीटर दिले जातील. शेतकरी बांधवांनी या पद्धतींनी शेतीचा सराव केल्यास कीटकांचे आक्रमण 90 टक्क्यांपर्यंत कमी होईल. याशिवाय 3 ते 5 अंश सेल्सिअस तापमानातही घट होईल. शेतकरी बांधव वर्षभर फळे व भाजीपाल्याची लागवड करू शकतात. ठिबक सिंचनाद्वारे 90 टक्के पाण्याची बचत होईल. ही पद्धत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी उपयुक्त ठरेल.


अशी करा नोंदणी? 


सुरुवातीला अधिकृत वेबसाइट https://horticulture.bihar.gov.in/ वर जा
आता मुख्यपृष्ठावरील संबंधित लिंकवर क्लिक करा
त्यानंतर शेतकऱ्यांसमोर अर्ज येईल.
फॉर्ममध्ये आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.


पॉलीहाऊसबद्दल सविस्तर माहिती


पॉीहाऊसला ग्रीनहाऊस असे देखील म्हटले जाते. पॉलीहाऊस ची रचना ही यावर पारदर्शक पद्धतीचे आवरण असते म्हणजे भिंती आणि छत हे पारदर्शक कापडाने झाकलेले असते. पॉलीहाऊस चा वापर फुले, फळे, भाज्या यांसारखी पिके घेण्यासाठी करण्यात येते.पॉलीहाऊस आपल्याला एक नियंत्रित हवामान प्रदान करते जेणेकरून शेतकऱ्यांना तापमान,आद्रता, प्रकाश याचे नियंत्रण करता येते. याद्वारे शेतकरी पाहिजे ते पीक वर्षभर पिकवू शकतात आणि उत्पन्न मिळवू शकतात. पॉशेतकरी बाहेरील जे तापमान असेल त्यापेक्षा कमी किंवा जास्त तापमान आत मद्ये ठेऊ शकतात. म्हणजे बाहेरच्या वातावरणाचा जास्त परिणाम पिकावर होत नाही. व यामुळे पॉलीहाऊस आपण वर्षभर पिके घेऊ शकतो.


महत्वाच्या बातम्या:


काय आहे सोलर पॅनल सबसिडी योजना? या योजनेद्वारे किती मिळते अनुदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर