मुंबई : शेअर बाजारात अनेक कंपन्या चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. काही कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिले आहेत. तर काही कंपन्यांची स्थिती सध्या चांगली असून भविष्यात या कंपन्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस पाडू शकतात. सध्या अशाच काही शेअर्सची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांना भविष्यात चांगले रिटर्न्स देण्याची शक्यता असणारे पाच महत्त्वाचे शेअर्स जाणून घेऊ या...
भविष्यात साधारण 44 टक्के रिटर्न्स देण्याची ताकत असणारे काही स्टॉक्स देण्यात आले आहेत.
मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेस (MedPlus Health Services)
मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेस ही कंपनी भविष्यात गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स देण्याची शक्यता आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 8,252 कोटी रुपये आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सना खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच भविष्यात ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना साधारण 44.9 टक्के रिटर्न्स देण्याची शक्यता आहे.
लँडमार्क कार्स (Landmark Cars)
लँडमार्क कार्स ही कंपनीदेखील सध्या चांगल्या स्थितीत आहे. या कारचे बाजार भांडवल साधारण 2,653 कोटी रुपये आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. भविष्यात ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 43.3 टक्क्यांनी रिटर्न्स देऊ शकते.
इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया (Electronics Mart India)
इलेक्ट्रॉनिक मार्ट इंडिया ही कंपनीदेखील गुंतवणूकदारांना भविष्यात चांगले रिटर्न्स देऊ शकते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 7,963 कोटी रुपये आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार हा शेअर भविष्यात 40.1 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स देऊ शकतो.
अव्हेन्यू सुपरमार्ट्स (Avenue Supermarts)
अव्हेन्यू सुपरमार्ट्स ही कंपनी शेअर बाजारावर भविष्यात चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 338,254 कोटी रुपये आहे. या कंपनीचे शेअर्स खरेदी केले असतील तर ते होल्ड करण्याचा सल्ला शेअऱ बाजारातील तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच आगामी काळाती ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना साधारण 21.2 टक्क्यांनी रिटर्न्स देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शॉपर्स स्टॉप (Shoppers Stop)
शॉपर्स स्टॉप ही कंपनी सध्या चांगल्या स्थितीत दिसत आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 9,786 कोटी रुपये आहे. तुमच्याकडे या कंपनीचे शेअर्स असतील तर ते होल्ड करण्याचा सल्ला शेअऱ बाजारातील तज्ज्ञांनी दिला आहे. ही कंपनी भविष्यात 20.3 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
KRN engineering आयपीओला तुफान प्रतिसाद, रचला नवा इतिहास; आता गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट होणार?