Mumbai Terrirst Attack Alert : मुंबई : दहशतवाद्यांकडून (Terrirst Attack) मुंबईला (Mumbai News) धोका असल्याची माहिती सेंट्रल एजन्सीकडून मुंबई पोलिसांना (Mumbai Police) मिळाली. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे. दहशतवाद्यांकडून मुंबईला धोका असल्याच्या माहितीनंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर असून गर्दीची ठिकाणं आणि धार्मिक स्थळांवर मुंबई पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे. 


दहशतवाद्यांकडून मुंबईला धोका आहे, अशी माहिती सेंट्रल एजन्सी यांच्याकडून मुंबई पोलिसांना मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत आणि मुंबईत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार, गर्दीची ठिकाणी आणि धार्मिक स्थळांवर मुंबई पोलिसांकडून नजर ठेवण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी आणि धार्मिक स्थळांवर'मॉक ड्रिल्स'करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरातील सर्व डीसीपींना त्यांच्या-त्यांच्या झोनमध्ये सुरक्षा व्यवस्थेवर विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आलं आहे.


एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, शुक्रवारी पोलिसांनी क्रॉफर्ड मार्केट परिसरात मॉकड्रिल केलं, हा तो परिसर आहे. जिथे मोठी गर्दी होते आणि येथे दोन प्रमुख धार्मिक स्थळं आहेत. आगामी काळात विधानसभा आहे, या पार्श्वभूमीवर कोणत्याही दंगली किंवा गालबोट लागेल, असं काही होऊ नये यासाठी मुंबई पोलीस खबरदारी घेत होते. आणि त्यातच आता दहशतवाद्यांकडून धोका असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता, मुंबई पोलिसांनी मुंबई शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.


संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून 'मॉक ड्रिल'


संभाव्य दहशतवादी धोक्यांबाबत केंद्रीय यंत्रणांनी दिलेल्या सतर्कतेनंतर मुंबई पोलिसांनी मुंबई शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. या अलर्टनंतर धार्मिक स्थळे आणि इतर गर्दीच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,"आम्हाला गर्दीच्या ठिकाणी आणि धार्मिक स्थळांवर 'मॉक ड्रिल' आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील सर्व डीसीपींना त्यांच्या संबंधित झोनमधील सुरक्षा व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आलं आहे."


एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "शुक्रवारी पोलिसांनी क्रॉफर्ड मार्केट परिसरात एक मॉक ड्रिल केलं. क्रॉफर्ड मार्केट परिसर म्हणजे, मुंबईतील अत्यंत वर्दळीचा भाग. या भागात दोन प्रमुख धार्मिक स्थळे देखील आहेत." अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात मॉक ड्रिल का केलं जात आहे, असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यानंतर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सर्व मंदिरांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि खबरदारीचा उपाय म्हणून कोणत्याही संशयास्पद हालचालींची तक्रार करण्यास सांगण्यात आलं आहे.