मुंबई : सध्या आयपीओ मार्केटमध्ये (IPO Market) चांगले दिवस आले आहेत. बजाज हाऊसिंग फायनान्स, पु. ना. गाडगीळ यासारख्या आयपीओंनी आपल्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिले आहेत. बजाज हाऊसिंग फायानान्सचे रेकॉर्ड नेमकं कोण मोडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान आता KRN Heat Exchanger या आयपीओने नवा इतिहास रचला आहे. हा आयपीओ तब्बल 211 पटीने सबस्क्राईब झाला आहे. संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीमध्येही या आयपीओने नवा विक्रम केला आहे. हा आयपीओ QIB म्हणजेच संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीत तब्बल 253.04 पटीने सबस्क्राईब झाला आहे. 


काही तासांत आयपीओ ओव्हरसबस्क्राईब


याआधी Bajaj Housing Finance हा आयपीओ QIB विभागात 222 पट सबस्क्राईब करण्यात आला होता. यासह प्रीमियर एनर्जीस (Premier Energies) हा आयपीओदेखील QIB श्रेणीत 212 पटीने सबस्क्राईब करण्यात आला होता. KRN हिट एक्स्चेंजर्स अँड रेफ्रिजरेशन कंपनी लिमिटेड हा आयपीओ आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न्स देण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. याच कारणामुळे या आयपीओला दमदार रिटर्न्स मिळत आहेत. या आयपीओल एकूण 211 पटीने सबस्क्राईब करण्यात आलंय. NII विभागात हा आययपीओ 428.01 पट तर रिटेल विभागात हा आयपीओ 93.72 पटीने सबस्क्राईब करण्यात आला आहे.


ग्रे मार्केटमध्ये नेमकी स्थिती काय? 


ग्रे मार्केटमध्येदेखील या आयपीओ धमाल उडवली आहे. KRN Heat Exchanger ही एका शेतकऱ्याच्या मुलाची कंपनी आहे. या कंपनीचे मालक संतोष कुमार यादव आहेत. आता लवकरच ही कंपनी शेअर बाजारावर (Stock Market) येणार आहे. KRN Heat Exchanger या कंपनीचा अनलिस्टेड मार्केटमध्ये बोलबाला आहे. ग्रे मार्केट प्रीमियममध्ये (GMP) या कंपनीत मोठी गुंतवणूक केली जात आहे. या मार्केटमध्ये KRN हिट एक्स्चेंजर्स अँड रेफ्रिजरेशन कंपनी लिमिटेड या कंपनीचा शेअर 124.55 टक्के म्हणजेच 274 रुपये प्रति शेअर आहे. म्हणजेच ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध होताच गुंतवणूकदारांचे पैसे डबल होण्याची शक्यता आहे.


कंपनी 15,543,000 शेअर्स जारी करणार


KRN Heat Exchanger  हा आयपीओ 25 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या काळात गुंतवणुकीसाठी खुला होता. कंपनी आपयीओच्या माध्यमातून 341.95 कोटी रुपये उभी करणार होती. तर या पैशांच्या बदल्यात कंपनी एकूण 15,543,000 शेअर्स जारी करणार होती. या प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपये होती. मात्र गुंतवणुकीसाठी खुला होताच अवघ्या काही तासांत हा आयपीओ ओव्हरसबस्क्राईब झाला. KRN IPO साठी कंपनीने 209 रुपये ते 220 रुपयांचा किंमत पट्टा निश्चित केला आहे. या आयपीओत एका लॉटमध्ये एकूण 65 शेअर्स दिले जातील. एका आयपीओसाठी 14,300 रुपये मोजावे लागणार होते. KRN ही कंपनी 3 ऑक्टोबर रोजी शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहे.


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


स्विगीने IPO साठी केलं महत्त्वाचं काम, अमिताभ बच्चन, माधुरीनंतर आता तुमच्यावरही पडू शकतो पैशांचा पाऊस!