Richest Man on Earth : टेस्लाचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी मोठा धक्का बसला आहे. एलॉन मस्क यांना मागे टाकत 74 वर्षांचे फ्रेंच उद्योगपती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (Richest Man) ठरले आहेत. फ्रेंच बिझनेस टायकून बर्नार्ड अर्नोल्ट (Bernard Arnault) आता जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. एलॉन मस्क आणि बर्नार्ड अर्नोल्ट यांच्या संपत्ती जास्त फरक नाही. काही फरकाने एलॉन मस्क यांना श्रीमंतांच्या यादीतील पहिलं स्थान गमवावं लागलं आहे. फोर्ब्सच्या यादीत ही माहिती समोर आली आहे.

Continues below advertisement

बर्नार्ड अर्नोल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

फोर्ब्सने जगातील श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नोल्ट हे आहे. बर्नार्ड अर्नोल्ट यांची संपत्ती 207.6 अब्ज डॉलर आहे. तर यानंतर दुसऱ्या क्रमांकावर स्टारएक्स आणि टेस्लाचे सीईओ आणि ट्विटरचे मालक एलॉन मस्क हे आहेत. एलॉन मस्क यांची संपत्ती 204.7 अब्ज डॉलर आहे. 

मस्क यांच्या संपत्ती 18 अब्ज डॉलर्सने घट

या दोघांच्या संपत्ती शुक्रवारी चढ-उतार पाहायला मिळाला. बर्नार्ड अर्नोल्ट यांची संपत्ती शुक्रवारी 23 अब्ज डॉलर्सने वाढली तर, एलॉन मस्क यांना मात्र झटका बसला. शुक्रवारी एलॉन मस्क यांच्या संपत्ती 18 अब्ज डॉलर्सने घट झाली. बर्नार्ड अर्नोल्ट आणि एलॉन मस्क या दोन्ही उद्योगपतींच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये चढ-उतार पाहायला मिळाला, त्यामुळे त्यांच्या संपत्तीवर परिणाम झाला. LVMH चे मार्केट कॅप देखील 13 टक्क्यांनी वाढून 388 बिलियन डॉलर झालं आहे. दुसरीकडे, घसरणीनंतरही, टेस्लाचे मार्केट कॅप 586 डॉलर अब्जवर पोहोचलं.

Continues below advertisement

कोण आहेत बर्नार्ड अर्नोल्ट?

बर्नार्ड अर्नोल्ट (Bernard Arnault) आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. बर्नार्ड अर्नोल्ट (Bernard Arnault) एक फ्रेंच उद्योगपती असून ते 74 वर्षांचे आहे. बर्नार्ड अर्नोल्ट LVMH कंपनीचे मालक आहेत. LVMH कंपनीचं पूर्ण नाव Moet Hennessy Louis Vuitton असं आहे.  बर्नार्ड अर्नोल्ट लक्झरी ब्रँड लुई व्हिटनचे मालक (LVMH Louis Vuitton) आहेत. याशिवाय सेफोरा हा देखील या कंपनीचा ब्रँड आहे.

LVMH कंपनीचे एकूण 75 फॅशन आणि कॉस्मेटिक ब्रँड आहेत. 2021 मध्ये, लुई व्हिटॉनने अमेरिकन ज्वेलर टिफनी अँड कंपनीचे अधिग्रहण केलं. सुमारे 16 अब्ज डॉलर किमतीचा हा करार इतिहासातील सर्वात मोठा लक्झरी ब्रँड संपादन मानला जातो. अर्नोल्टची होल्डिंग कंपनी आगाशे यांची अगाय नावाची व्हेंचर कॅपिटलिस्ट फर्म आहे. या कंपनीची Netflix आणि ByteDance सारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. अर्नोल्टची 5 मुलेही त्यांच्याच कंपनीत काम करतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

FD Scheme : लवकरच बंद होणार 'ही' खास FD योजना! 8.05 टक्के व्याज, अंतिम मुदतीसाठी उरले फक्त काही दिवस