Bernard Arnault : जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे. काही अब्जाधिशांच्या (billionaire) संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. तर एका अब्जाधीशांच्या संपत्तीत एका दिवसात 2.7 लाख कोटी रुपयांची म्हणजेच 32.3 अब्ज डॉलरची वाढ झालीय. एवढी मोठी वाढ झाल्यामुळं हा अब्जाधिश जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. बर्नार्ड अरनॉल्ट (Bernard Arnault) असं या अब्जाधिशाचं नाव आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्तीत वाढ कधी दिसून येत नाही. अचानक वाढ झाल्यामुळं बर्नार्ड अरनॉल्ट यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला आहे. 


बर्नार्ड अरनॉल्ट (Bernard Arnault) हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. त्यांनी सगळ्यांचे विक्रम मोढीत काढले आहेत. जेफ बेझोस आणि एलन मस्क या दिग्गज अब्जाधिशांना बर्नार्ड अरनॉल्ट यांनी मागं टाकलं आहे. या दोघेही अब्जाधिश खूप मागे पडले आहेत.  दरम्यान, बर्नार्ड अरनॉल्ट यांच्या संपत्ती 22 मार्च रोजी 2.7 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. दरम्यान, मुकेश अंबानीच्या संपत्तीचा विचार केला तर बर्नार्ड अरनॉल्ट यांची संपत्ती मुकेश अंबानी यांच्यापेक्षा दुप्पट अधिक आहे. 


बर्नार्ड अरनॉल्ट यांची एकूण संपत्ती नेमकी किती?


बर्नार्ड अरनॉल्ट यांची एकूण संपत्ती एवढी वाढली आहे की, जगातील 450 अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीपेक्षाही जास्त आहे. संपत्तीत एका दिवसात 2.7 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. जेफ बेझोस आणि एलन मस्क यांना बर्नार्ड अरनॉल्ट यांनी खूप मागे टाकलं आहे. आता परत पहिल्या स्थानावर येण्यासाठी जेफ बेझोस आणि एलन मस्क यांना मोठी मेहनत करावी लागणार आहे. बर्नार्ड अरनॉल्ट यांच्या संपत्तीत एका दिवसात 2.7 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झालीय, या वाढीसह त्यांची एकूण संपत्ती 230 अब्ज डॉलर झाली आहे. त्यामुळं ते संपत्तीच्या बाबतीत सगळ्यांच्या पुढे गेले आहेत. 2024 चा विचार केला तर  बर्नार्ड अरनॉल्ट यांच्या संपत्तीत 22.7अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. कोणत्याही अब्जाधिशाने 230 अब्ज डॉलरचा आकडा गाठणे ही पहिलीच वेळ आहे. 


जेफ बेझोस आणि एलन मस्क यांची संपत्ती किती?


बर्नार्ड अरनॉल्ट यांनी जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत पहिला क्रमांक मिळवल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर दुसऱ्या क्रमांकावर जेफ बेझोस  आहेत. त्यांच एकूण संपत्ती ही 202 अब्ज डॉलर आहे. त्याच्या संपत्तीत 750 दशलक्ष डॉलर्सची वाढ झाली आहे. या वर्षात जेफ बेझोस यांच्या संपत्तीत 24.8 अब्ज डॉलरची वाढ झालीय. दरम्यान, बर्नार्ड अरनॉल्ट आणि जेफ बेझोस यांच्या संपत्तीत तब्बल 28 अब्ज डॉलरचा फरक आहे. तर एलन मस्क हे तिसऱ्या स्थानावर गेले आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही 185 अब्ज डॉलर आहे. त्यंच्या संपत्तीत 1.42 अब्ज डॉलरची घट झाली आहे. या दोघांच्या संपत्तीत मोठा फरक आहे.  


महत्वाच्या बातम्या:


3 महिन्यात 9800 कोटींची कंपनी, 27 व्या वर्षीच अब्जाधीश, कोण आहे भारताचा 'हा' तरुण उद्योगपती?