Bank Holiday : आज देशभरात महाशिवरात्रीचा (Mahashivratri) उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. त्यामुळं अनेक राज्यातील बँकांना आज सुट्टी असणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला आज बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. बँकांची सुट्टी संदर्भातील यादी पाहूनच नियोजन करावे. आज महाशिवरात्रीनिमित्त विविध राज्यातील बँकांना सुट्टी असणार आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती पाहुयात.


या राज्यात बँकांना सुट्टी


ग्राहकांच्या सोयीसाठी, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) स्थानिक सण, वर्धापनदिन इत्यादी लक्षात घेऊन बँक सुट्ट्यांची यादी अगोदर प्रसिद्ध करते. यामुळे त्यांना नंतर कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागत नाही. आजही अनेक राज्यात बँकांना सुट्टी मिळणार आहे. यानंतर 9 आणि 10 तारखेला दुसरा शनिवार आणि त्यानंतर रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. अशा स्थितीत अनेक ठिकाणी बँकांना तीन दिवस सलग सुट्टी राहणार आहे. ज्या शहरांमध्ये आज बँकांना सुट्टी असणार आहे, त्यामध्ये अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरु, चंदीगड, डेहराडून, कोची, लखनौ, मुंबई, भोपाळ, भुवनेश्वर, हैदराबाद, जम्मू, कानपूर, नागपूर, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर आणि त्रिवेंद्रम या राज्याचा समावेश आहे.


मार्च 2024 मध्ये किती दिवस बँका बंद राहणार 


09 मार्च 2024- दुसऱ्या शनिवारमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
10 मार्च 2024- रविवारमुळे बँका बंद राहतील.
17 मार्च 2024- रविवारमुळे बँका बंद राहणार आहेत.
22 मार्च 2024- बिहार दिनानिमित्त पाटण्यातील बँकांना सुट्टी असेल.
23 मार्च 2024- चौथ्या शनिवारमुळे बँका बंद राहतील.
24 मार्च 2024- रविवारमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
25 मार्च 2024- होळीमुळे बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, इंफाळ, कोची, कोहिमा, पाटणा, श्रीनगर आणि त्रिवेंद्रम वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहणार आहेत.
26 मार्च 2024- भोपाळ, इंफाळ, पाटणा येथे होळी किंवा याओसांग दिनानिमित्त बँका बंद राहतील.
27 मार्च 2024- पाटण्यातील बँकांना होळीनिमित्त सुट्टी असेल.
29 मार्च 2024- गुड फ्रायडेमुळे आगरतळा, गुवाहाटी, जयपूर, जम्मू, शिमला आणि श्रीनगर वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.


बँकांना सुट्टी असल्यास काय कराल?


बँक ही एक आवश्यक वित्तीय संस्था आहे. अशा स्थितीत दीर्घकाळ बँकांमध्ये सुट्टी राहिल्यास अनेक महत्त्वाची कामे रखडतात, मात्र बदलत्या तंत्रज्ञानामुळे बँकिंगच्या पद्धतीत बरेच बदल झाले आहेत. बँकेला सुट्टी असूनही, तुम्ही नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग किंवा UPI द्वारे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. याशिवाय ग्राहक रोख रक्कम काढण्यासाठी एटीएमचा वापर करू शकतात.


महत्वाच्या बातम्या:


'या' 30 बँकांमध्ये तुमचे पैसे अडकलेत का? पैसे परत मिळवण्यासाठी नेमकं काय कराल? सविस्तर माहिती एका क्लिकवर