मुंबई : सध्या ऑनालाईन पद्धतीने बँकेचे व्यवहार करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. यूपीआय, नेट बँकिंग आदी माध्यमातून आता अनेकजण पैशांची देवाणघेवाण करतात. दरम्यान, ऑनलाईन पद्धतीने व्यवहार वाढल्यामुळे फसवणुकीच्या प्रकारातही वाढ झाली आहे. त्यामुळे सायबर क्राईम रोखण्यासाठी बँका योग्य ती खबरदारी घेत असतात. मात्र तरीदेखील आता ग्राहकांची ऑनलाईन पद्धतीने केली जाणारी आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी  बँकांनी आता विशेष इंटेलिजन्स सिक्योरिटी सिस्टीम तयार केली आहे. या प्रणालीच्या मदतीने ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 


इंटेलिजन्स सिक्योरिटी सिस्टीमची निर्मिती


ऑनलाईन व्यवहार करताना बँकेच्या ग्राहकांना अनेक मार्गांनी लुटले जाते. खोटा इमेल, बनावट संकेतस्थळ, बनावट मेसेज या माध्यमातून लोकांची लूट होते. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच बँकांनी इंटेलिजन्स सिक्योरिटी सिस्टीम तयार केली आहे. कोणत्याही ग्राहकाचे एखाद्या संशयास्पद बँक खात्याशी व्यवहार होत असल्याचे दिसल्यावर या सिस्टिमद्वारे ग्राहकांना अलर्ट पाठवले जाईल. व्यवहार पूर्ण होण्याआधीच या सिस्टिमद्वारे ग्राहकांना तसे संदेश पाठवले जातील. 


अशा पद्धतीने काम करणार इंटेलिजन्स सिस्टिम


बँकांकडून एक क्रेडिट इंटेलिजन्स सिक्योरिटी सिस्टीम तयार केली जात आहे. या सिस्टिमच्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने केल्या जाणाऱ्या संशयास्पद व्यवहाराची संपूर्ण माहिती बँकांना मिळणार आहे. तुमच्याशी संबंधित कोणतेही संशयास्पद व्यवहार दिसून आल्यास, तसा तुम्हाला अलर्ट पाठवला जाईल. तसेच त्या आर्थिक व्यवहारासंदर्भात तुमच्याकडून कन्फॉर्मेशन न मिळाल्यास तो संबंधित व्यवहार रद्द केला जाईल. एचडीएफसी बँकेकडून यूपीआय, नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, क्रेडिट आणि डेबिट कार्ड आदी व्यवहारांना ही सिस्टीम लागू केली जाणार आहे.


आयसीआयसीआय बँकेच्या प्रवक्त्यांनीही या अत्याधुनिक प्रणालीविषयी प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या ग्राहकाच्या बँक खात्यावर संशयास्पद व्यवहार केला जात असल्याचे आमच्या निदर्शनास आल्यास आम्ही त्यांना रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर कॉल केला जाईल. त्यानंतर संबंधित व्यवहाराचे कन्फर्मेशन न मिळाल्यास तो व्यवहार रद्द केला जाईल. 


अशा प्रकारे शोधणार संशयास्पद व्यवहार


संशयास्पद व्यवहार रोखण्यासाठी बँकांनी एका अॅनालिटिक्स टीमची स्थापना केलेली आहे. संशयास्पद व्यहारांचा शोध घेणे तसेच त्यांना रोखणे हे या टीमचे काम आहे. या टीमकडून कधीकधी सामान्य व्यवहारांनाही संशयास्पद व्यवहार म्हणून गृहित धरले जाऊ शकते. अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करणारी एचडीएफसी ही पहिली बँक ठरली आहे.  


हेही वाचा :


HDFC बँकेचा SMS अलर्टच्या सुविधेबाबत मोठा निर्णय; नवा नियम 25 जूनपासून लागू!


निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारात नेमकं काय घडणार? जाणून घ्या मार्केटचा 20 वर्षांचा इतिहास!