कोणताही धोका न पत्करता गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवा यासाठी सर्वांचा प्रयत्न असतो. मात्र अशा प्रकारे गुंतवणूक करायची असेल तर एफडी म्हणजेच मुदत ठेव हा सर्वोत्तम पर्याय आहे, असे मानले जाते. एफडीमध्ये गॅरंडीट रिटर्न्स मिळतात. चालू मे महिन्यात अनेक बँकांनी याच एफडीवरील व्याजदर वाढवला आहे. म्हणजेच व्याजदर वाढवलेल्या बँकात एफडी केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. यामध्ये स्मॉल फायनान्स बँक (Utkarsh Small Finance Bank), सिटी यूनियन बँक (City Union Bank), आरबीएल बँक (RBL Bank) आणि कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक (Capital Small Finance Bank) या चार बँकांचा समावेश आहे.


उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक  


2 कोटी रुपयांपर्यंत एफडी करणाऱ्यांसाठी या बँकेने आपल्या व्याजदरात बदल केला आहे. या बँकेकडून एफडीवर आता चार टक्क्यांपासून ते 8.5 टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे.


आरबीएल बँक


आरबीएल बँकेनेदेखील एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे. बदलेला हा व्याजदर 2 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर लागू असेल. नव्या बदलानुसार 18-24 महिन्यांसाठीच्या एफडीवर आरबीएल बँकेकडून आठ टक्क्यांनी व्याज मिळणार आहे.


कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक 


कॅपिटल स्मॉल फायनान्स बँकेकडूनही आता एफडीवरील व्याजदरात बदल करण्यात आला आहे. हा बदलेला व्याजदार आता दोन कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर लागू असेल. या बँकेकडून एफडीवर 3.5 टक्क्यांपासून ते 7.55 टक्क्यांपर्यंतचे व्याज दिलेजात आहे. या बँकेकडून 400 दिवसांसाठीच्या एफडीवर सर्वाधिक व्याज दिले जात आहे. 


सिटी यूनियन बँक


सिटी यूनियन बँकेनेदेखील आपल्या व्याजात बदल केल आहे. बदललेला हा व्याजदर 2 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर लागू असेल. या बँकेकडून ग्राहकांना 5 ते 7.25 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जात आहे. 400 दिवसांच्या एफडीवर ही बँक 7.25 टक्के व्याज देत आहे.  


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


SBI चे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर सावधान, 'हा' नवा नियम जाणून घ्या; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान!


'या' चार योजनांत गुंतवणूक करा अन् टेन्शन फ्री व्हा, म्हातारपणी मिळणार भरघोस पेन्शन!


एसआयपी करताना फक्त 'ही' चार सूत्रं पाळा, मालामाल व्हा; मिळवा दुप्पट, चौपट परतावा!