Bank Strike : यावर्षी डिसेंबर महिन्यापासून ते नवीन वर्षात जानेवारी 2024 पर्यंत बँक कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. बँकांमध्ये पुरेशा कर्मचाऱ्यांची भरती करावी. तसेच नियमित नोकऱ्यांच्या आऊटसोर्सिंगला विरोध करत बँक युनियन संपावर जात आहेत. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने हा संप पुकारला आहे. यामुळं एकूण 13 दिवस देशातील बँकिंग सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.


4 डिसेंबर 2023 पासून बँक  कर्मचाऱ्यांच्या युनियने संप पुकारला आहे.  हा संप 20 जानेवारी 2024 पर्यंत वेगवेगळ्या टप्प्यात सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 4 डिसेंबर 2023 रोजी देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक  सिंध बँकेचे कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार आहेत. तसेच बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी 5 डिसेंबर 2023 पासून संपावर जाणार आहेत. तर कॅनरा बँक आणि युको बँकेचे कर्मचारी 6 डिसेंबर 2023 रोजी संपावर जाणार आहेत. तसेच इंडियन बँक आणि युको बँकेचे कर्मचारी 7 डिसेंबर 2023 रोजी संपावर जाणार आहेत.
8 डिसेंबर 2023 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार आहेत. 11 डिसेंबर रोजी खासगी बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत.


नवीन वर्षात सर्वच बँकांचे कर्मचारी संपावर जाणार


नवीन वर्ष 2024 मध्ये, सर्वच बँकांचे कर्मचारी टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकाच वेळी संपावर जाणार आहेत.


 2 जानेवारी 2024 रोजी दक्षिण भारतातील सर्वच बँकांचे कर्मचारी तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पुद्दुचेरी, अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीपमध्ये संपावर जाणार आहेत.


3 जानेवारी 2024 रोजी सर्व बँक कर्मचारी पश्चिम भारतातील गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दादर, दमण, दीव या राज्यांमध्ये संपावर जाणार आहेत.


4 जानेवारी 2024 रोजी राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत.


5 जानेवारी 2-24 रोजी दिल्ली, पंजाब, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमधील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत.


6 जानेवारी 2024 रोजी पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, आसाम, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या पूर्वेकडील राज्यांमध्ये बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत.


19 आणि 20 जानेवारी 2024 रोजी देशव्यापी संप


19 आणि 20 जानेवारी 2024 रोजी देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे बँक कर्मचारी दोन दिवसीय देशव्यापी संपावर जाणार आहेत. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या माहितीनुसार, अलिकडच्या वर्षांत बँक ग्राहकांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. बँकांच्या व्यवसायाचे प्रमाण वाढल्याने बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. मात्र, या कालावधीत पुरेशा प्रमाणात कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही. सेवानिवृत्ती, पदोन्नती आणि मृत्यूमुळं बँकांमधील रिक्त जागा वाढल्या आहेत. मात्र त्या भरल्या जात नाहीत. अतिरिक्त साठा दिला जात नाही. अनेक सरकारी योजना बँकेमार्फत चालवल्या जातात. सरकारी बँकांनी 50 कोटी जन धन खाती उघडली आहेत. त्यामुळे शाखांमधील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


FD Rates : ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी संधी, 'या' 5 बँका FD वर देतायेत भरघोस व्याज