Bank Sakhi Scheme: आजच्या युगात महिलांनी (Women) सशक्त राहणं अत्यंत गरजेचे आहे. अशा परिस्थितीत सरकार (Govt) महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी वेळोवेळी अनेक योजना राबवत आहे. अशीच एक योजना म्हणजे बँक सखी योजना. या योजनेद्वारे महिला दरमहा 40 हजार रुपये कमावत आहेत. बँक सखी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यावर भर दिला जातो. 


बँक सखी योजनेंतर्गत ग्रामीण महिलांना बँक सखी बनवले जाते. जे गावातील लोकांच्या बँकेशी संबंधित गरजा पूर्ण करतात. खेड्यातील जे लोक बँकेत जाऊ शकत नाहीत किंवा बँक त्यांच्या घरापासून खूप दूर आहे, बँक सखी त्यांच्या घरी बँकिंग सुविधा उपलब्ध करून देते. ही योजना उत्तर प्रदेशात वेगाने सुरू आहे. देशातील इतर राज्येही या योजनेचा अवलंब करून ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण करत आहेत. या योजनेची सविस्तर माहिती पाहुयात.


बँक सखी योजना म्हणजे काय?


देशात अशी लाखो गावे आहेत जी शहराच्या संपर्कापासून दूर आहेत. त्यांना शहरात जाणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत गावातील वयोवृद्धांना पेन्शन, मनरेगा भरणे आणि बँक खाते उघडण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागू नये, यासाठी केंद्र सरकारच्या बँक सखी योजनेंतर्गत महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच बँकेशी संबंधित सर्व कामे गावातच झाली पाहिजेत.


बँक सखी बनण्यासाठी पात्रता काय ?


बँक सखी बनण्यासाठी महिलांना प्रशिक्षणानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्सद्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असेल. बँक सखींनाही बँकिंग कामासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. बँक सखी जितके अधिक बँकेचे काम पूर्ण करेल तितके तिला अधिक प्रोत्साहन मिळेल. अशा परिस्थितीत महिला बँक सखी बनून 25 ते 40 हजार रुपये कमवत आहेत.