Bank Holidays in Oct 2023 : बँकाचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सणासुदीच्या काळात ऑक्टोबर महिन्यात 15 दिवस बँका बंद (Banks closed) राहणार आहेत. त्यामुळं बँकांचे व्यवहार करणाऱ्या नागरिकांनी लवकरात लवकर बँकांची कामे उरकावीत. कोणत्याही ग्राहकांची गैरसोय होऊ नये, म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.
ऑक्टोबरमध्ये सणांच्या दिवशी बँका राहणार बंद
2 ऑक्टोबरला गांधी जयंती आहे. त्यानंतर नवरात्री उत्सव, दसरा यामुळं बँका बंद राहणार आहेत. RBI ने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह एकूण 15 दिवस बँका बंद राहणार आहेत. सार्वजनिक क्षेत्राव्यतिरिक्त खासगी क्षेत्रातील आणि प्रादेशिक बँकांनाही 15 दिवस सुट्टी असणार आहे. अशा परिस्थितीत, बँकेशी संबंधित कोणतेही कामे करताना अडचण येऊ नये म्हणून, सुट्टीची यादी देण्यात आली आहे.
ऑक्टोबरमध्ये 'या' दिवशी बंद राहणार बंद
1 ऑक्टोबर 2023- रविवारमुळं देशभरात बँका बंद राहतील.
2 ऑक्टोबर 2023 - गांधी जयंतीनिमित्त देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
8 ऑक्टोबर 2023- रविवारमुळं देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
14 ऑक्टोबर 2023- महालयामुळं कोलकातामध्ये आणि दुसऱ्या शनिवारी संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
15 ऑक्टोबर 2023- रविवारमुळं संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल.
18 ऑक्टोबर 2023- गुवाहाटीमध्ये काटी बिहू या सणामुळं बँका बंद राहणार.
21 ऑक्टोबर 2023- दुर्गापूजा/महा सप्तमीनिमित्त आगरतळा, गुवाहाटी, इंफाळ, कोलकाता येथील बँकांना सुट्टी असेल.
22 ऑक्टोबर 2023- रविवारमुळं देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
24 ऑक्टोबर 2023- दसऱ्यामुळं हैदराबाद आणि इंफाळ वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
25 ऑक्टोबर 2023- गंगटोकमध्ये दुर्गापूजेमुळे (दसई) बँका बंद राहतील.
26 ऑक्टोबर 2023- गंगटोक, जम्मू आणि श्रीनगरमध्ये दुर्गा पूजा (दसाई)/अॅक्सेशन डे बँका बंद राहतील.
27 ऑक्टोबर 2023- गंगटोकमध्ये दुर्गापूजेला (दसई) बँका बंद राहतील.
28 ऑक्टोबर 2023- कोलकात्यासह संपूर्ण देशात लक्ष्मीपूजन आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील.
29 ऑक्टोबर 2023- देशभरात बँका बंद राहतील.
31 ऑक्टोबर 2023- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहमदाबादमधील बँकांना सुट्टी असेल.
बँक बंद असताना तुमचे काम कसे पूर्ण कराल?
अनेकवेळा बँकांच्या सुट्ट्यांमुळे लोकांना खूप त्रासाला सामोरे जावे लागते. मात्र, बदलत्या तंत्रज्ञानामुळे लोकांचा हा त्रास कमी झाला आहे. आजकाल लोक एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगचा वापर करतात. त्याच वेळी, UPI देखील आजकाल ग्राहक मोठ्या प्रमाणात वापरत आहेत. पैसे काढण्यासाठी तुम्ही एटीएम वापर करु शकता.
महत्त्वाच्या बातम्या: