Bank Holidays in November 2022 : नोव्हेंबर (November) महिना सुरु व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. त्यामुळे ग्राहकांना जर बॅंकेत काही महत्वाची कामं असतील तर आताच उरकून घ्या. कारण नोव्हेंबर महिन्यात 10 दिवस बॅंका बंद (November Bank Holidays) राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. नुकत्याच, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार नोव्हेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बॅंका बंद (November Bank Holidays) असणार आहेत याची यादी जाहीर केली आहे.  


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या कॅलेंडरनुसार नोव्हेंबरमध्ये एकूण 10 दिवस बँक सुट्टी (November Bank Holidays) असेल. राज्य आणि तिथल्या सणानुसार या सुट्ट्या बदलू शकतात. बँक सुट्ट्यांची यादी आरबीआय (RBI) 3 आधारावर जारी करते. ही यादी देशभरात आणि राज्यांमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या सणांवर आधारित आहे.


सुट्ट्यांची संपूर्ण यादी  (Bank Holidays List in November 2022) :


1 नोव्हेंबर 2022 : कन्नड राज्योत्सव/कुट - बेंगळुरू आणि इंफाळमध्ये बँका बंद


6 नोव्हेंबर 2022 : रविवार 


8 नोव्हेंबर 2022 : गुरु नानक जयंती/कार्तिका पौर्णिमा/रहस पौर्णिमा/वंगळा उत्सव- आगरतळा, बंगळुरू, गंगटोक, गुवाहाटी, इम्फाळ, पंजी, कोयता , पाटणा, शिलाँग आणि तिरुवनंतपुरम व्यतिरिक्त इतर ठिकाणी बँक बंद  


11 नोव्हेंबर 2022 : कनकदास जयंती/वंगला उत्सव - बंगळुरू आणि शिलाँगमध्ये बँक बंद


12 नोव्हेंबर 2022 : शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)


13 नोव्हेंबर 2022 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)


20 नोव्हेंबर 2022 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)


23 नोव्हेंबर 2022 : सेंग कुत्सानेम - शिलाँगमध्ये बँक बंद


26 नोव्हेंबर 2022 : शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)


27 नोव्हेंबर 2022 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)


वरील नमूद केलेल्या दिवसांच्या सुट्ट्या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या सुट्ट्यांनुसार लागू होणार आहेत. या बॅंकेच्या सुट्ट्या असल्या तरी खातेधारकांनी बॅंकेचे काही काम करण्यासाठी नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरू शकतात. तुम्ही या सुट्ट्यांचा मागोवा ठेवल्यास, तुम्ही बँकेच्या व्यवहाराची अधिक चांगल्या पद्धतीने योजना करू शकाल. लाँग वीकेंडसाठी, तुम्ही तुमच्या सुट्ट्यांचे उत्तम नियोजन देखील करू शकता.


महत्वाच्या बातम्या : 


Share Market Opening Bell: शेअर बाजारात तेजीचे संकेत; सेन्सेक्सने गाठला 60 हजार अंकांचा टप्पा