TV Actor Shaan Mishra Got Assaulted by Producer : प्रसिद्ध टीव्ही शो 'जय मा लक्ष्मी'च्या सेटवर हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. 'जय मा लक्ष्मी' फेम टीव्ही अभिनेता शान मिश्रा याला निर्मात्यांकडून मारहाण झाल्याचं सांगितलं जात आहे. अभिनेता शान मिश्रा याचं निर्मात्यांसोबत भांडण झालं, पुढे हे भांडण मारहाणीपर्यंत पोहोचलं. काही कारणावरुन शान मिश्रा आणि निर्मात्यांमध्ये बाचाबाची झाली, यानंतर निर्मात्यांना त्याला मारहाण केल्याचा दावा अभिनेत्याने केला आहे. अभिनेता शान मिश्रा याने गुरुवारी पोलिसांत धाव घेत शोच्या निर्मात्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
अभिनेता शान मिश्राच्या हाताला दुखापत
अभिनेता शान मिश्राला दुखापत झाली होती. हाताला दुखापत झाल्यामुळे त्याने निर्माते मंगेश यांना शूटिंग लवकर संपवण्याची विनंती केली. शानने निर्मात्यांकडे शूटींग लवकर संपवून घरी जाण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती. हाताला दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांनी शानला शूटिंग न करण्याचा सल्ला दिला आहे, मात्र, आपल्यामुळे शूटींगवर परिणाम होऊ नये, यासाठी तो शूटींगला सेटवर पोहोचला. आगामी एपिसोडच्या टेलिकास्टवर परिणाम होऊ नये म्हणून अभिनेता शान शूटींगला पोहोचला आणि त्याने निर्मात्यांना लवकर पॅक अप करण्याची विनंती केली, यावरुनच वाद झाला.
निर्मात्याच्या पत्नीनेही केलं भांडण
दरम्यान, जेव्हा शानने शूटिंग लवकर संपवण्याची विनंती केली, तेव्हा निर्मात्याने आधी सहमती दर्शविली होती, पण त्यानंतर मात्र त्याची विनंती नाकारली आणि यामुळे अभिनेता शान आणि आणि मंगेश यांच्यात जोरदार वाद झाला. मंगेशची पत्नीही यात सहभागी झाली आणि टेलि टॉकने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती शानवर ओरडताना आणि त्याला त्याचे काम पूर्ण करण्यास सांगताना दिसत आहे.
निर्मात्याने मान पकडत कानाखाली मारली
व्हिडीओमध्ये निर्मात्याची पत्नी बोलत आहे की, "तुला जे करायचे आहे, ते करा. तुझं काम पूर्ण कर आणि मग निघून जा. तुम्ही मला काय दाखवशील... तु रोज इथे येऊन खेळून जातो," असे तो म्हणताना तुम्हाला व्हिडीओमध्ये दिसत आहे. शानने ही सर्व घटना मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केली. यावेळी निर्माता मंगेशने शानला भांडण रेकॉर्ड करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी त्याने त्याला मारहाण केल्याचा आरोप शानने केला आहे, यामुळे वाद विकोपाला गेला. त्यानंतर निर्मात्याने त्याचा गळा धरला आणि त्याच्या पत्नीनेही त्याच्यावर हल्ला केल्याचं अहवालात म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :