Bank Holidays in Feb 2023: नवीन वर्ष 2023 चा पहिला महिना म्हणजेच जानेवारी लवकरच संपणार आहे. अशातच वर्षाचा दुसरा महिना सुरू होण्यापूर्वी (Bank Holidays in Feb 2023) बँक एकूण किती दिवस बंद राहणार आहेत,  हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. बँक हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आजकाल इंटरनेट बँकिंग (Internet Banking), मोबाईल बँकिंग (Mobile Banking) मुळे लोकांची बरीचशी कामे घरबसल्याच होतात. पण मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढणे (Cash Withdrawal), डिमांड ड्राफ्ट (Demand Draft) इत्यादी कामांसाठी बँकेची गरज आहे. जर तुम्हाला बँकेतील काही महत्त्वाचे काम फेब्रुवारी महिन्यात पूर्ण करायचे असेल तर या संपूर्ण महिन्यातील सुट्टीची यादी नक्की पहा.


Bank Holidays in Feb 2023: फेब्रुवारी महिन्यात बँका किती दिवस बंद राहतील?


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात बँकांना भरपूर सुट्ट्या आहेत. या संपूर्ण महिन्यात विविध राज्यांमध्ये एकूण 10 दिवस बँका बंद राहतील. जर तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात काही महत्त्वाचे काम करायचे असेल तर या बँकेच्या सुट्टीची यादी पाहूनच बँकेत जाण्याचा निर्णय घ्या. फेब्रुवारी महिन्यात शनिवार आणि रविवार व्यतिरिक्त महाशिवरात्रीसारख्या सणांना बँका बंद राहतील. फेब्रुवारी महिन्यातील बँकेच्या सुट्टीची यादी पाहूया-


Bank Holiday Full List on Feb 2023 : फेब्रुवारी 2023 मध्ये 'या' दिवशी बँकांना सुट्टी असेल


5 फेब्रुवारी 2023 - रविवार (देशभरातील बँका बंद राहतील) 
11 फेब्रुवारी 2023 - दुसरा शनिवार (देशभरातील बँका बंद राहतील) 
12 फेब्रुवारी 2023 - रविवार (देशभरातील बँका बंद राहतील) 
15 फेब्रुवारी 2023- Lui-Ngai-Ni (हैदराबादमध्ये बँका बंद राहतील) 
18 फेब्रुवारी 2023 - महाशिवरात्री (मुंबई, नागपूर, अहमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, हैदराबाद, कानपूर, लखनौ, रायपूर, रांची, शिमला, तिरुअनंतपुरम येथे बँका बंद राहतील) 
19 फेब्रुवारी 2023 - रविवार (देशभरातील बँका बंद राहतील) 
20 फेब्रुवारी 2023 - राज्य दिन (आयझॉलमध्ये बँका बंद राहतील) 
21 फेब्रुवारी 2023- लोसर (गंगटोकमध्ये बँका बंद राहतील) 
25 फेब्रुवारी 2023 - तिसरा शनिवार (देशभरातील बँका बंद राहतील) 
26 फेब्रुवारी 2023 - रविवार (देशभरातील बँका बंद राहतील)


दरम्यान, फेब्रुवारीतील एकूण 28 दिवसांपैकी विविध राज्यांमध्ये 10 दिवस बँका बंद राहतील. अशा परिस्थितीत जर तुम्हाला फेब्रुवारीमध्ये बँक हॉलिडेमध्ये कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल, तर तुम्ही ते नेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगद्वारे करू शकता. याशिवाय एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही UPI वापरू शकता. यासोबतच तुम्ही क्रेडिट, डेबिट कार्डही सहज वापरू शकता.