Bank Holiday in February 2024 : बँकांचे (Bank) व्यवहार करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण पुढील फेब्रुवारी (February) महिन्यात बरेच दिवस बँका बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत लोकांनी सुट्टीची यादी पाहूनच कामाचं नियोजन करावं. पाहुयात कोणत्या दिवशी नेमक्या का राहणार बँका बंद.


पुढच्या पाच दिवसात 2024 या वर्षाचा पहिला महिना संपणार आहे. वर्षाचा दुसरा म्हणजे फेब्रुवारी महिना सुरु होणार आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला पुढील महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असेल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण, फेब्रुवारीमध्ये बँकांना खूप सुट्ट्या (Bank Holiday) आहेत. शनिवार आणि रविवारच्या सुट्यांव्यतिरिक्त फेब्रुवारीमध्ये बसंत पंचमी, छत्रपती शिवाजी जयंती आदींनिमित्त अनेक दिवस बँकांना सुट्टी असणार आहे.


फेब्रुवारी महिन्यात 11 दिवस बँका राहणार बंद


फेब्रुवारी महिन्याच्या 29 दिवसांपैकी 11 दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहेत. यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया महिना सुरू होण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. जेणेकरून ग्राहकांना कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागू नये. बँक ही एक आवश्यक वित्तीय संस्था आहे. अशा परिस्थितीत दीर्घ सुट्टी असताना अनेक महत्त्वाची कामे रखडतात. 


कोणत्या दिवशी बँका राहणार बंद  


4 फेब्रुवारी 2024- रविवारमुळे देशभरात बँका राहणार बंद  
10 फेब्रुवारी 2024- महिन्याच्या दुसऱ्या शनिवारमुळं देशभरातील बँकांना सुट्टी 
11 फेब्रुवारी 2024- रविवारमुळं संपूर्ण देशात बँका बंद 
14 फेब्रुवारी 2024 - बसंत पंचमी किंवा सरस्वती पूजेमुळं आगरतळा, भुवनेश्वर, कोलकाता येथे बँका बंद
15 फेब्रुवारी 2024- लुई-न्गाई-नीमुळे इंफाळमधील बँकांना सुट्टी 
18 फेब्रुवारी 2024- रविवारमुळं संपूर्ण देशात सुट्टी 
19 फेब्रुवारी 2024- छत्रपती शिवाजी जयंतीनिमित्त मुंबईत बँका बंद 
20 फेब्रुवारी 2024- राज्य दिनानिमित्त आयझॉल आणि इटानगरमध्ये बँका बंद 
24 फेब्रुवारी 2024- दुसऱ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद 
25 फेब्रुवारी 2024- रविवारमुळे देशभरातील बँका बंद 
26 फेब्रुवारी 2024- न्योकुममुळे इटानगरमधील बँकांना सुट्टी 


बँक बंद असताना कसे कराल काम पूर्ण?


बँकांना दीर्घ सुट्ट्यांमुळं अनेक वेळा महत्त्वाची कामे रखडतात. अशा परिस्थितीत नवीन तंत्रज्ञानामुळं ग्राहकांची अनेक कामे सुलभ झाली आहेत. तुम्ही घरबसल्या नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा UPI द्वारे एका बँक खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. पैसे काढण्यासाठी तुम्ही एटीएमचा वाप करु शकता.


महत्त्वाच्या बातम्या:


सरकारी बँकांसांठी एक दिलासादायक बातमी, 3 बँकांनी 3 महिन्यांत कमावले 6498 कोटी रुपये