Bank Franchise : युवकांसाठी व्यवसायाचे अनेक मार्ग आहेत. वेगवेगळे व्यवसाय करुन युवक चांगला नफा देखील मिळवू शकतात. व्यवसायाच्या माध्यमातून कमी गुंतवणुकीत (Invetsment) मोठा नफा मिळवता येतो. आज आपण अशाच एका व्यवसायाबद्दल माहिती पाहणार आहोत. तो व्यवसाय म्हणजे बँक फ्रँचायझी (Bank Franchise). तुम्ही बँक फ्रँचायझी घेऊन घरबसल्या चांगला नफा कमवू शकता. या माध्यमातून तुम्हाला चांगले कमिशनही मिळेल आणि पगारही मिळेल. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
घरबसल्या बँक फ्रँचायझी उघडणे हा मोठा पैसा कमावण्याचा उत्तम मार्ग आहे. विशेषत: ज्यांना आर्थिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा मार्ग चांगला आहे. बँक फ्रँचायझी उघडल्याने तुम्हाला बँक खाते उघडणे, कर्ज वाटप, चेक डिपॉझिट, मनी ट्रान्सफर आणि इतर आर्थिक उत्पादनांची विक्री यासारख्या विविध सेवा प्रदान करता येतात. याद्वारे तुम्ही केवळ कमिशनच मिळवू शकत नाही, तर निश्चित पगारही मिळवू शकता.
बँक फ्रँचायझी उघडण्याचे फायदे काय?
जेव्हा तुम्ही फ्रँचायझी उघडता तेव्हा तुम्हाला विविध बँकिंग सेवांसाठी कमिशन मिळते. कर्ज, ठेवी आणि इतर आर्थिक उत्पादनांची विक्री, यासोबतच काही बँकांकडून पगारही दिला जातो. घरबसल्या बँकिंग सेवा देण्यासाठी तुम्हाला मोठ्या गुंतवणुकीची गरज नाही. तुम्हाला एक लहान कार्यालय आवश्यक आहे. तुम्ही बँकेकडून प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय सुरु करु शकता. घरुनच बँक फ्रँचायझीच्या माध्यमातून तुम्ही काम सुरु केल्यानं तुमचा वेळ आणि खर्च वाचतो.
जर तुम्ही प्रस्थापित आणि विश्वासार्ह बँकेची फ्रँचायझी निवडली असेल, तर तुम्हाला दीर्घकाळ व्यवसाय करता येतो. बँकांकडे आधीपासूनच मोठा ग्राहकवर्ग आहे, ज्यामुळं तुमची कमाई देखील स्थिर असू शकते.
बँक फ्रँचायझीसाठी आवश्यक अट काय?
बँका सहसा अशा ठिकाणी फ्रँचायझी उघडण्यास प्राधान्य देतात जिथे लोकांना आर्थिक सेवांची जास्त गरज असते. प्रत्येक बँक फ्रँचायझीला वेगवेगळ्या गुंतवणुकीची आवश्यकता असते. बँकेच्या नियमांनुसार ही रक्कम बदलू शकते. बँकांना फ्रँचायझी देण्यासाठी काही शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता देखील आवश्यक असू शकतात. जसे की वित्तीय सेवांमधील अनुभव. तुमच्याकडे मोठा ग्राहक आधार असल्यास, तुम्हाला मदत करण्यासाठी एक किंवा अधिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता असू शकते.
बँकांच्या वेबसाईटवर फ्रँचायझी योजनांची माहिती
बँका त्यांच्या वेबसाइटवर त्यांच्या फ्रँचायझी योजनांची माहिती देते. तुम्ही तिथे जाऊन अर्ज करू शकता. तुम्ही बँकेच्या फ्रँचायझी विभागाशी जवळच्या शाखेतून किंवा फोनद्वारेही संपर्क साधू शकता. जर तुम्हाला बँकिंग क्षेत्राची आवड असेल तर तुम्ही घरबसल्या बँक फ्रँचायझी उघडून चांगली कमाई करु शकता.
महत्वाच्या बातम्या: