Abhishek Bachchan And Aishwarya Rai Divorce Rumours: सध्या बॉलिवूडचं (Bollywood) सर्वाधिक चर्चेत असणारं कपल ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांचा घटस्फोट झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच सध्या व्हायरल होणारा एक फोटो अफवांचं पेव उठवणाऱ्यांना भारी चपकार म्हणा किंवा आणखी काय? असाच आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो सर्व अफवांना सडेतोड उत्तर आहे. घटस्फोटाच्या जोरदार अफवांमध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन एका पार्टीमध्ये एकत्र दिसून आले. दोघांचा एकत्र फोटो घटस्फोटाच्या सर्व चर्चांचं खंडन करतो. हा फोटो तुम्ही पाहिलाय का?
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन नुकतेच एका पार्टीत एकत्र दिसले होते. या इव्हेंटमधले त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांच्या या फोटोनं त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत.
Abhishek Bachchan आणि Aishwarya Rai Bachchan दोघेही गुरुवारी रात्री आयशा जुल्का, अनु रंजन आणि इतर प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत पोज देताना दिसले. यावेळी ऐश्वर्याची आई वृंदाही सोबत होती.
"बहुत सारा प्यार..."
फिल्ममेकर अनु रंजननं फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ऐश्वर्या राय सेल्फी काढताना दिसत आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याची आईसुद्धा फोटोमध्ये आहेत. फोटोला कॅप्शन दिलं आहे की, "बहुत सारा प्यार..."
आराध्याच्या बर्थडेमध्येही उपस्थित होता अभिषेक...
सध्या ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटांच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशातच अभिषेक आराध्याच्या बर्थडेलाही आला नव्हता, असं बोललं जात होतं. त्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला, त्यातून अभिषेक आराध्याच्या बर्थडे पार्टीला असल्याचं स्पष्ट झालं होतं.
अमिताभनं ब्लॉगमध्ये लिहिलेल्या काही गोष्टी...
अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या अफवा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. नुकतेच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं होतं की, "मी कुटुंबाबद्दल फार कमी बोलतो, कारण हे माझं क्षेत्र आहे आणि त्याची प्रायव्हसी मी सांभाळते. सट्टा म्हणजे सट्टा. ते पडताळणीशिवाय अनुमान आहेत.
17 वर्षांपूर्वी लग्न झालंय...
अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न 2007 मध्ये झाले होते. 2011 मध्ये त्यांची मुलगी आराध्याचा जन्म झाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :