Share Market: बकरी ईदमुळे भारतीय शेअर बाजार (Indian Share Market) आता बुधवारऐवजी गुरुवारी बंद (Share Market Holiday) राहणार आहे. गुरुवारी शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही. नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (NSE) मंगळवारी एक परिपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र सरकारने सोमवारी बकर ईदच्या सुट्टीत बदल जाहीर केला होता. यानंतर NSE ने देखील बकर ईदची सुट्टी बुधवार ऐवजी गुरुवारी केली आहे. साप्ताहिक आणि मासिक डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट आता बुधवारी संपणार असून बकरी ईदची सुट्टी गुरुवारी असणार आहे. राष्ट्रीय शेअर बाजारने (NSE) याबाबतची माहिती दिली.
एक दिवस आधीच एक्सपायरी
राष्ट्रीय शेअर बाजारने (NSE) दिलेल्या माहितीनुसार, सिंगापूर एक्सचेंचवर ट्रेड होणारे निफ्टी आणि निफ्टी बँक डेरिवेटिव्हस कॉन्ट्रॅक्ट एक्सपायरी आता गुरुवार ऐवजी बुधवारी संपणार आहे. भारतात डेरिवेटिव्हस कॉन्ट्रॅक्ट प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी संपतात. आता, गुरुवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने एक्सपायरी एक दिवस आधीच संपणार आहे.
निफ्टी बँकसाठी एक्सपायरी दिवस बदलला
या महिन्याच्या सुरुवातीला एनएसईने निफ्टी बँक डेरिवेटिव्हस कॉन्ट्रॅक्ट एक्सपायरी गुरुवारऐवजी शुक्रवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्यापासून हा नवीन निर्णय अंमलात येणार आहे.
शेअर बाजारात आज तेजी
मंगळवारी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 0.71 टक्क्यांनी वाढून 446.03 अंकांनी 63,416.03 अंकांवर बंद झाला. त्याच वेळी, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 0.68 टक्के किंवा 126.20 अंकांनी वाढून 18,817.40 वर बंद झाला. एचडीएफसी लाइफ, अपोलो हॉस्पिटल्स, एसबीआय आणि एसबीआय लाईफ निफ्टी-50 मध्ये सर्वाधिक वाढले.
एचडीएफसी आणि HDFC बँकेचं होणार विलीनीकरण
देशातील सर्वात मोठी हाऊसिंग कंपनी एचडीएफसी (HDFC) आणि एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीचे 1 जुलैपासून विलिनीकरण होणार आहे, अशी माहिती एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी दिली. या विलिनीकरणानंतर एचडीएफसी फायनान्स एचडीएफसी बँकेचा एक भाग बनेल. विलिनीकरणासाठी लागणारी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असून 30 जून रोजी बाजार बंद झाल्यानंतर एचडीएफसी बोर्डाची या प्रक्रियेसाठीची अखेरची बैठक पार पडणार आहे.
शेअरहोल्डर्सना मिळणार संपूर्ण हिस्सा
एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) गेल्या वर्षी HDFC लिमिटेड ताब्यात घेण्यास आपली सहमती दर्शवली होती. हा करार 40 अब्ज डॉलर्सचा असून याची प्रस्तावित एकत्रित मालमत्ता सुमारे 18 लाख कोटी रुपयांची असेल. यानंतर, एचडीएफसी बँकेचे भागधारक बँकेतील 41 टक्के समभाग धारण करतील. HDFC लिमिटेडच्या प्रत्येक भागधारकाला त्याच्याकडे असलेल्या प्रत्येक 25 समभागांमागे HDFC बँकेचे 42 शेअर्स मिळणार आहेत.