Avenue Supermarkets : देशातील 'रिटेल किंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राधाकिशन दमानी यांचे रिटेल स्टोअर डीमार्ट चालवणाऱ्या एव्हेन्यू सुपरमार्केट्स लिमिटेडने तिसऱ्या तिमाहीत प्रचंड नफा कमावला आहे. आकडेवारीनुसार, तीन महिन्यांत कंपनीच्या नफ्यात सुमारे 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर परिचालन महसुलात 17 टक्के वाढ दिसून आली आहे. Avenue Supermarkets Limited चा निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 4.8 टक्क्यांनी वाढून 723.54 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 690.41 कोटी रुपये होता.
तिमाही निकाल जाहीर होण्यापूर्वी, एव्हेन्यू सुपरमार्केट लिमिटेडच्या समभागांमध्ये 3 टक्क्यांहून अधिक घसरण झाली होती. तिमाही निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होऊ शकते.
नफा आणि महसूल वाढेल Avenue Supermarkets Limited चा निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 4.8 टक्क्यांनी वाढून 723.54 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 690.41 कोटी रुपये होता. शनिवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत कंपनीने सांगितले की, समीक्षाधीन तिमाहीत तिचा महसूल 17.68 टक्क्यांनी वाढून 15,972.55 कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 13,572.47 कोटी रुपये होता.
उत्पन्नात झाली प्रचंड वाढ
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्याचे मार्जिन 4.5 टक्के होते, जे गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 5.1 टक्के होते. ऑक्टोबर-डिसेंबर 2024 तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च 18.52 टक्क्यांनी वाढून 15,001.64 कोटी रुपये झाला आहे. अव्हेन्यू सुपरमार्टचे एकूण उत्पन्न (इतर उत्पन्नासह) समीक्षाधीन कालावधीत 17.57 टक्क्यांनी वाढून 15,996.69 कोटी रुपये झाले आहे. शुक्रवारी अव्हेन्यू सुपरमार्केट लिमिटेडच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी Avenue Supermarkets Limited चे शेअर्स 3.34 टक्क्यांच्या घसरणीसह 3,685.70 रुपयांवर बंद झाले. तर ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीच्या शेअर्सनेही दिवसभरातील 3,666.65 रुपयांची खालची पातळी गाठली. तर शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 3,842.20 रुपयांवर उघडले. तज्ञांच्या मते, कंपनीच्या शेअर्समध्ये तिची कमाई आणि नफा लक्षात घेता वाढ होऊ शकते. एव्हेन्यू सुपरमार्केट लिमिटेडच्या नफ्यात वाढ होत असल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. शेअर बाजार सध्या तेजीत असल्याचं पाहा.यला मिळत आहे. त्याचा फायदा या कंपनीला होत आहे. गुंतवणूकदारांना देखील चांगला फायदा होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या: