सप्टेंबर महिना ऑटो मार्केटसाठी खूप खास असणार आहे. या महिन्यात अनेक ऑटो कंपन्या त्यांच्या कार भारतात लॉन्च करणार आहेत. यामध्ये फोक्सवॅगनची (Volkswagen) बहुप्रतिक्षित तैगुन (Taigun) ते एमजीची (MG) एस्टर (Astor) बाजारात आणली जाईल. सणासुदीपूर्वी या गाड्या लॉन्च होणार आहेत, ग्राहकही या गाड्यांची प्रतीक्षा करत आहे. लेटेस्ट फीचर्स व्यतिरिक्त, कंपन्या त्यांना मजबूत इंजिनसह लॉन्च करतील. 


फोक्सवॅगन तैगुन (Volkswagen Taigun)


जर्मन ऑटो ब्रँड फोक्सवॅगनचा बहुप्रतिक्षित तैगुन गाडीही सप्टेंबरमध्ये भारतीय बाजारात दाखल देईल. केबिनला ड्युअल टोन ब्लॅक आणि ग्रे कलर आणि सेंटर स्टेजवर 10-इंच इन्फोटेनमेंट डिस्प्ले आहे. तैगुनमध्ये हवेशीर फ्रंट सीट, इलेक्ट्रिक सनरूफ, एलईडी हेडलॅम्प, क्लायमेट कंट्रोल टाइप-सी यूएसबी पोर्ट देखील आहे. एसयूव्हीला स्टोरेज पॉकेट्स, सेंट्रल आर्मरेस्ट आणि टू-टोन फॅब्रिक आणि फॉक्स लेदर अपहोल्स्ट्री देखील मिळते. तैगुन दोन टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन 1-लिटर TSI आणि 1.5-लिटर TSI सह येईल. 113 बीएचपी आणि 175 एनएम टॉर्क जनरेट करण्यासाठी तयार केले गेले आहे. दुसरा इंजिन पर्याय 1.5 लिटर 4-सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिन आहे आणि ते जास्तीत जास्त 150 PS आणि 250 Nm पीक टॉर्क जनरेट करेल. दोन्ही इंजिनांसाठी 6-स्पीड मॅन्युअल आणि 1.0-लिटर युनिटसाठी टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक आहे. हे 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड DSG सह उपलब्ध असेल. त्याची किंमत सुमारे 10 लाख रुपये असू शकते.


एमजी एस्टर (MG Astor)


एमजी मोटर आपली नवीन एसयूव्ही, एमजी एस्टर देखील सप्टेंबर महिन्यात भारतात लाँच करेल. ही मध्यम आकाराची एसयूव्ही पर्सनल एआय असिस्टेंटने सुसज्ज असेल. हे त्याचे खूप मोठे वैशिष्ट्य आहे, जे माणसांप्रमाणे भावना आणि आवाजात काम करते. तसेच हा पर्सनल AI असिस्टंट आपल्याला विकिपीडियासह प्रत्येक विषयावर संपूर्ण माहिती देण्यास सक्षम आहे. एमजी एस्टरचा हा वैयक्तिक AI असिस्टंट खूप खास आहे. हे कारच्या डॅशबोर्डवर बसवण्यात आले आहे आणि त्यासोबत एक स्क्रीन देखील देण्यात आली आहे. हे तुमच्या व्हॉईस कमांडवर काम करते. आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्याबरोबरच, सनरूफ उघडणे आणि बंद करणे यासारख्या विविध कार्यांमध्ये मदत करण्यास सक्षम आहे. हे पर्सनल AI असिस्टंट अमेरिकेच्या स्टार डिझाईन कंपनीने तयार केले आहे.


ह्युंदाई आय 20 एन लाइन (Hyundai i20 N Line)


ह्युंदाई आय 20 एन लाइन या कारमध्ये बरेच लेटेस्ट फीचर्स आहेत. 10.25 इंचाच्या टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिमसोबतच नवीन i20 N लाइनमध्ये एक नवीन व्हॉइस रिकग्निशन फीचर देखील आहे, त्यामुळे ड्रायव्हिंगचा अजून चांगला अनुभव मिळतो. याशिवाय डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, वायरलेस फोन चार्जिंग, क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, सिंगल-पॅन सनरूफ, 7-स्पीकर बोस साउंड सिस्टिम, 6 एअरबॅग, टीपीएमएस, रिअर-व्ह्यू पार्किंग कॅमेरा, स्वयंचलित हेडलॅम्प, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल(ESC), व्हेइकल स्टेबिलिटी कंट्रो (VSC), हील असिस्ट कंट्रोल (HAC) असे अनेक फीचर्स आहेत. ही कार भारतात दोन व्हेरिअंटमध्ये- N6 iMT, N8 iMT आणि N8 DCT लाँच करण्यात आली आहे. ही कंपनीच्या N Line मॉडलची भारतातील पहिलीच कार आहे.  कारमध्ये कंपनीने 1.0 लिटर क्षमतेचं 3-सिलेंडरयुक्त टर्बो पेट्रोल इंजिन दिलं आहे. हे इंजिन 120hp पॉवर आणि 172Nm टॉर्क जनरेट करतं. या इंजिनसोबत 6-स्पीड iMT आणि 7-स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन गियरबॉक्स आणि पॅडल शिफ्टरचा पर्याय देखील आहे. 


किया सेल्टोस एक्स लाईन (Kia Seltos X Line)


किआ सेल्टोस एक्स लाइन पुढील महिन्यात भारतात लाँच केली जाऊ शकते. यात चमकदार ब्लॅक ग्रिल मिळेल. त्याच्या हेडलाइटमध्ये फारसा बदल दिसणार नाही. त्याचा फ्रंट बम्पर देखील इम्प्रुव्ह करण्यात आला आहे. त्याची रचना आणि मांडणी मुख्यत्वे पूर्वीसारखीच आहे. या एसयूव्हीमध्ये एपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह यूव्हीओ कनेक्टेड कार सिस्टीमसह 10.25-इंच टचस्क्रीन डिस्प्लेसारखे फीचर्स मिळतील. याशिवाय, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, सनरूफ, एअर प्युरिफिकेशन सिस्टर, बोस साउंड सिस्टीम देखील देण्यात आली आहे. किआ सेल्टोस एक्स लाइनमध्ये 1.4-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल मोटर आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन दिले जाऊ शकते. 1.4-लीटर GDI टर्बो पेट्रोल इंजिन 138bhp पर्यंत पॉवर आणि 250Nm पर्यंत टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. याशिवाय 1.5 लीटर सीआरडीआय डिझेल इंजिन 113bhp पर्यंतची पॉवर आणि 250Nm पर्यंत टॉर्क जनरेट करेल.