चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाने 1 सप्टेंबरपासून सर्व वाहन खरेदीवर बंपर-टू-बंपर इन्शुरन्स अनिवार्य करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे येत्या 1 सप्टेंबरपासून गाड्यांच्या किंमती वाढणार आहेत. बंपर-टू-बंपर इन्शुरन्स हा पाच वर्षांसाठी असून यामध्ये ड्रायव्हर, पॅसेंजर आणि वाहन मालकांना कव्हर करणाऱ्या इन्शुरन्स व्यतिरिक्त असेल.
मद्रास उच्च न्यायालयाने न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकवर हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती एस वैद्यनाथन यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे की, बंपर-टू-बंपर इन्शुरन्समुळे वाहन मालकावर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार नाही. या पाच वर्षाच्या कालावधीनंतर वाहन चालक, पॅसेंजर आणि थर्ड पार्टी यांनी सावध राहिलं पाहिजे कारण पाच वर्षानंतर हे इन्शुरन्स पुढे सुरु ठेवता येणार नाही.
कार खरेदी महाग
मद्रास उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता कार खरदी महाग होणार आहे. त्यामुळे आता कोणतीही कार खरेदी करण्यासाठी दहा ते बारा हजार रुपये अतिरिक्त भरावे लागणार आहेत. टू व्हीलरसाठी एक हजार रुपये अतिरिक्त भरावे लागणार आहेत.
सध्या फोर व्हीलरसाठी तीन वर्षाचा तर टू व्हीलरसाठी दोन वर्षाचा इन्शुरन्स असणं बंधनकारक आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या या ताज्या निर्णयानुसार आता पाच वर्षांपर्यंत बंपर-टू-बंपर इन्शुरन्स बंधनकारक करण्यात आलं आहे.
काय आहे बंपर-टू-बंपर इन्शुरन्स?
बंपर-टू-बंपर इन्शुरन्समध्ये कार किंवा कोणत्याही गाडीला पूर्ण इन्शुरन्स कव्हरेज मिळतं. या इन्शुरन्सचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये गाडीच्या नुकसान झालेल्या प्रत्येक पार्टचे पेमेंट केले जाते. म्हणजे गाडीला 100 टक्के इन्शुरन्स कव्हर मिळते.
संबंधित बातम्या :
- Car Tips : वर्षानुवर्षे कार सुरळीत चालवायची आहे? मग या 'पाच' गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका
- EPFO : PF खातेधारकांना मिळणार 7 लाखापर्यंतचा विमा, असा करा अर्ज
- Best Mileage CNG Cars : वाढत्या इंधन दरांच्या काळातही बेस्ट मायलेज कार, किंमतही वाचा