Doglapan Ashneer Grover Book : भारत पेचे ( Bharat Pay ) सह-संस्थापक ( Co-founder ) आणि माजी व्यवस्थापकीय संचालक ( MD - Managing Director ) अश्नीर ग्रोव्हर ( Ashneer Grover ) सध्या एका पुस्तकामुळे चर्चेत आहेत. अश्नीर यांनी 'दोगलापन' नावाचे पुस्तक ( Doglapan Book ) लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी 'शार्क टँक इंडिया' ( Shark Tank India ) या रिअॅलिटी शोशी ( Reality Show ) संबंधित अनेक चांगल्या आणि वाईट आठवणींना उजाळा दिला आहे.  शार्क टँक इंडिया टीव्ही शोमध्ये अश्नीर ग्रोवरचा 'दोगलापन' ( Duplicity ) म्हणजे टुटप्पीपणा हा शब्द खूप प्रसिद्ध झाला होता.


पुस्तकाचे नाव 'दोगलापन'


अश्नीर ग्रोव्हर लिखित 'दोगलापन' हे पुस्तक पुढच्या महिन्यात डिसेंबरमध्ये प्रकाशित होणार आहे. शार्क टँक इंडिया या रिअॅलिटी शोमध्ये अश्नीर ग्रोव्हरने वारंवार 'दोगलापन' हा शब्द वापरला होता. त्यावेळी सर्वांच्याच तोंडात हा शब्द होता, म्हणूनच या पुस्तकाचं नाव 'दोगलापन' असं ठेवण्यात आलं आहे. या पुस्तकात अश्नीर यांनी स्टार्टअप आणि त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी चढ-उतार याबद्दल सांगितलं आहे.


ग्रोव्हर यांनी ट्विट करून माहिती दिली


अश्नीर ग्रोव्हर यांनी एका ट्विटद्वारे आपल्या पुस्तकाची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही एकतर तुमची नोकरी पूर्णपणे सोडाल किंवा तुम्ही आयुष्यभर काम कराल. एकंदरीत तुम्ही व्यवसाय आणि नोकरी या दोघांच्या मधेच अडकणार नाही.'






डिसेंबरमध्ये प्रकाशित होणार 'दोगलापन' पुस्तक


ग्रोव्हर यांनी लिहिलेलं 'दोगलापन' हे पुस्तक 26 डिसेंबर 2022 रोजी प्रकाशित केलं जाणार आहे. यामध्ये ग्रोव्हर यांनी दिल्ली गेलेल्या बालपणापासून ते व्यवसाय क्षेत्रात नाव कमावण्यापर्यंतचा प्रवास सांगितला आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत असं लिहिलं आहे की, स्टार्टअप इंडियाचे ( Startup India ) आवडते असूनही गैरसमजामुळे अश्नीर यांच्यावर टीका झाली.


दोगलापन पुस्तक का वाचायला हवं?


अश्नीर ग्रोव्हर यांनी दोगलापन पुस्तकात स्वतःशी संबंधित सर्व वाद, मीडियाच्या बातम्या, सोशल मीडिया गॉसिपमुळे आणि सत्य काय हे सांगितलं आहे. या पुस्तकात अश्नीर ग्रोव्हर यांची त्यांच्या आयुष्यातील सत्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर अश्नीर ग्रोव्हर यांनी या वर्षाच्या सुरुवातीला भारत पेमधून राजीनामा दिला.


लवकरच येणार शार्क टँक इंडियाचा दुसरा सीझन 


शार्क टँक इंडियाचा पहिला सीझन संपला आहे. त्याचा दुसरा सीझन लवकरच येत आहे. पहिल्या सीझनमध्ये शोचा जज बनलेले अश्नीर ग्रोवर खूप चर्चेत आले होते. 'ये दोगलापन है' हा त्यांचा डायलॉग नंतर अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळत होता. ग्रोव्हर यांचा 'दोगलापन' हा शब्द पुस्तकाच्या रूपाने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधणार आहे.