Horoscope Today, November 13, 2022 : आज 13 नोव्हेंबर वार रविवार. आजचे राशीभविष्य (Todays Horoscope) वृश्चिक सोबत कर्क, कन्या आणि मीन राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. आज (13 नोव्हेंबर) बुध ग्रह रात्री 9 वाजून 13 मिनिटांनी वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. बुधाच्या या राशी परिवर्तनामुळं वृश्चिकसोबतच कर्क, कन्या आणि मीन राशीच्या लोकांना फायदा मिळणार आहे. या लोकांसाठी हा काळ खूप शुभ राहील. जाणून घेऊयात आजचं राशीभविष्य...
बुध संक्रमण 2022
ज्योतिषशास्त्रात बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, तर्क, हुशारी, संवादकारक ग्रह मानला जातो. हा ग्रह आपलं बोलणं आणि व्यवसायाचे प्रतिनिधित्व करतो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह मजबूत स्थितीत असतो, त्यांना कधीही कशाचीही कमतरता भासत नाही, अशी धारणा आहे.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ राहणार आहे. त्यांना व्यवसायात चांगला नफा मिळेल. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांसाठी हा काळ लाभदायक राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण शुभ काळ घेऊन येत आहे. करिअरमध्ये प्रगतीसोबतच त्यांना आर्थिक लाभही मिळतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या सुविधा वाढतील. मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
कन्या
कन्या राशींच्या लोकांना भावा-बहिणीचे प्रेम मिळेल. त्यांची ताकद वाढेल. नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. परदेश प्रवासाची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. धनलाभ होऊ शकतो.
मीन
बुधाचे वृश्चिक राशीत संक्रमण असल्याने मीन राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. यावेळी नशिबाच्या ठिकाणी शुभ योग तयार झाल्याने तुम्हाला लाभ होईल. ज्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल. लग्नाचीही शक्यता आहे. मांगलिक कार्य करता येईल. प्रवासाचे योग आहेत जे शुभ व फलदायी असतील. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.
तूळ
आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक जबाबदारी वाढेल, ज्यामुळं तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो.
धनु
आज तुम्हाला सर्व बाजूंनी आनंद मिळेल. व्यवसायात नवीन योजनांचा फायदा होईल. कुटुंबात सुसंवाद राहील. तुमच्या जोडीदाराप्रती तुमची ओढ वाढेल.
मकर
आजचा दिवस मजेत आणि आनंदाने भरलेला असेल. तुम्ही आयुष्य भरभरून जगाल. केवळ शहाणपणाची गुंतवणूक फलदायी ठरेल. तुमच्या मेहनतीचे पैसे हुशारीने गुंतवा. जर मनात तणाव असेल तर जवळच्या नातेवाईक किंवा मित्राशी बोला, तुमच्या मनाचा भार हलका होईल.
कुंभ
आजचा दिवस प्रवासात जाईल. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. प्रियकराशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. या राशीच्या व्यापारी वर्गाला अचानक काही मोठा फायदा होईल. आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा मजबूत होईल. काही नवीन लोक कुटुंबात सामील होऊ शकतात, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.
सिंह
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. नोकरीच्या ठिकाणी तुमची क्षमता सिद्ध करण्यासाठी तुम्हाला थोडा संघर्ष करावा लागू शकतो. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने यश मिळवता येते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)