Ashneer Grover On Paytm Crisis: पेटीएम पेमेंट बॅंकेवर (Paytm Bank) आरबीआयकडून (RBI) बॅंकिंग रेग्युलेशन ॲक्ट 35 अ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयकडून पेटीएम पेमेंट बॅंकेला कोणत्याही ठेवी स्वीकारण्यास बंदी घालण्यात आली आहे. पेटीएम बँकेने बॅंकिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. RBI ने केलेल्या या कारवाईवर भारत पे चे सह-संस्थापक आणि भारतातील प्रसिद्ध बिझनेस शो शार्क टँक इंडियाचे माजी जज अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बँकेनं केलेली कारवाई म्हणजे बँका महत्त्वाच्या आहेत, पण फिनटेक नाही असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. अर्थव्यवस्थेसाठी स्टार्टअप महत्त्वाचे नाहीत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.


अर्थव्यवस्था वाढवण्यात स्टार्टअप्सचे मोठं योगदान


आरबीआयने केलेली कारवाई म्हणजे अतिशयोक्ती असल्याचे भारत पे चे सह-संस्थापक आणि भारतातील प्रसिद्ध बिझनेस शो शार्क टँक इंडियाचे माजी जज अश्नीर ग्रोव्हर म्हणाले. केंद्रीय बँकेकडून  असा संदेश देण्यात येत आहे की, देशातील बँक महत्त्वाची आहे. fintech नाही असेही ते म्हणाले. आज देशात 111 युनिकॉर्न आहेत, परंतु त्यापैकी एकही अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा मानला जात नाही, तर या स्टार्टअप्सनी भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 6 ते 7.5 टक्क्यांपर्यंत नेला आहे. अर्थव्यवस्था वाढवण्यात योगदान दिले आहे. एफडीआय गुंतवणूक आणण्यात आणि रोजगार निर्मिती करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परंतू, RBI च्या कारवाईने हे स्पष्ट होते की देशात फिनटेकची गरज नाही.


भारतात संरचनात्मकदृष्ट्या मोठ्या स्टार्टअपसाठी आम्ही  तयार नाही. आरबीआयच्या कारवाईवर टीका करताना ते म्हणाले की पेटीएमवर केलेली कारवाई ही गंभीर शिक्षा आहे. दरम्यान, आरबीआयचे निर्णय घेण्यासाठी जबाबदार असलेले लोक साधारणतः 60 वर्षे वयाचे असतात. त्यांना बँकिंग व्यवस्था व्यवस्थापित करण्याचा दीर्घ अनुभव असतो, परंतू ते 40 वर्षांच्या व्यक्तीबद्दल संशय घेतात, असे ते म्हणाले. 


पेटीएमला फिनटेकचा जनक म्हणतात


रिझर्व्ह बँकेवर टीका करताना अश्नीर ग्रोव्हरने संकटग्रस्त पेटीएमला भारतातील फिनटेकचा जनक म्हटले आहे. या कंपनीचे अस्तित्वही पेटीएममुळेच आहे. पेटीएम हे भारतातील सर्व फिनटेकचे जनक आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी पेमेंट बँक परवाना मिळवणारी पेटीएम देशातील पहिली स्टार्ट-अप होती. हे घडले नसते तर भारत पेही झाले नसते. RBI ने केलेली कारवाई ही स्टार्टअप समुदायासाठी दुःखद घटना असल्याचे ते म्हणाले. 


पेटीएमच्या शेअर्समध्ये घसरण 


पेटीएम पेमेंट बँकेच्या सेवांवर बंदी घालण्याचा आदेश आरबीआयने 31 जानेवारी रोजी दिले आहोत. रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँक (पीपीबीएल) ला नवीन ग्राहक जोडण्यापासून रोखले आहे. बँक खात्यात किंवा फास्टॅगमध्ये कोणतीही ठेव ठेवण्यास बंदी घातली आहे. तेव्हापासून, पेटीएमच्या शेअरची किंमत 40 टक्क्यांहून अधिक घसरली आहे. गेल्या गुरुवारी हा शेअर 10 टक्क्यांच्या लोअर सर्किटला आला होता, तर शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, पेटीएम शेअर 6.16 टक्क्यांनी घसरला आणि 49.15 रुपयांच्या पातळीवर बंद झाला.


महत्वाच्या बातम्या:


Paytm Bank : पेटीएमच्या अडचणी कशा वाढल्या? आरबीआयने कारवाई का केली? जाणून घ्या सविस्तर