Apple CEO Salary : Apple कंपनीचे CEO टिम कुक (Tim Cook) यांचा पगार किती? असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल.  कंपनीने अलीकडेच टीम कुक यांचा पगार जाहीर केला आहे. अॅपल दरवर्षी सीईओला दिलेल्या पगाराचे आकडे जाहीर करते. 2023 मध्ये कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला भरघोस पगार देण्यात आली असला तरी तो 2022 च्या तुलनेत खूपच कमी आहे. 2023 मध्ये टिम कुकने किती कमाई केली याबाबतची माहिती पाहुयात. 


2023 मध्ये टिम कुकने किती केली कमाई?


Apple ने अमेरिकन एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, टिम कुक यांना 2023 मध्ये एकूण 3 मिलियन डॉलर म्हणजेच 25 कोटी रुपये पगार देण्यात आला आहे. जो 2022 आणि 2021 मध्ये सारखाच आहे. यासोबतच, टिम कुलला 46,970,283 डॉलर किमतीचे शेअर्स म्हणजेच एकूण 389.25 कोटी रुपये स्टॉक अवॉर्ड म्हणून गेल्या वर्षी देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त, त्याला 10,713,450 डॉलर म्हणजेच 88.78 कोटी रुपये नॉन-इक्विटी इन्सेन्टिव्ह आणि 2,526,112  डॉलर म्हणजेच 20.93 कोटी रुपये इतर नुकसानभरपाई म्हणून मिळाले आहेत. अशा परिस्थितीत अॅपलच्या सीईओची 2023 मध्ये एकूण कमाई 63209845 डॉलर म्हणजेच जवळपास 523.83 कोटी रुपये आहे. तर 2022 मध्ये ते सुमारे 99,420,097 डॉलर म्हणजेच 823.91 कोटी रुपये होते. अशा स्थितीत टीम कुकच्या पगारात गेल्या वर्षभरात 36 टक्के घट झाली आहे.


Apple ने आपल्या फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की टीम कुकला 2023 मध्ये पगार आणि नुकसानभरपाई म्हणून एकूण 63,209,845 डॉलर देण्यात आले आहेत. याशिवाय कंपनीने आपल्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगाराचाही खुलासा केला आहे. Apple चे CFO लुका मेस्त्री यांनी 2023 मध्ये 26,935,883 डॉलर कमावले आहेत. याशिवाय, Apple चे जनरल काउंसिल आणि सेक्रेटरी केट अॅडम यांनी 2023 मध्ये 26,941,705 डॉलर कमावले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: