Anand Rathi Wealth Shares Listing: आनंद राठी वेल्थचा स्टॉक आज शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. हा स्टॉक 10 टक्के प्रीमियमने शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. बीएसईवर हा शेअर 602 रुपयांवर सूचीबद्ध झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 600 रुपयांवर सूचीबद्ध झाला. सोमवारी टेगा इंडस्ट्रीने शेअर बाजारात सूचीबद्ध होताना गुंतवणुकदारांना चांगला परतावा दिला होता.
ग्रे मार्केटमध्ये काय होती परिस्थिती?
आनंद राठी वेल्थचा आयपीओ हा ग्रे मार्केटच्या अंदाजानुसार सूचीबद्ध झाला. सोमवारी, ग्रे मार्केटमध्ये आनंद राठी वेल्थचा शेअर 50 रुपयांचा प्रीमियम दर सुरू होता. हा शेअर 600 रुपयांच्या आसपास सूचीबद्ध होईल असा अंदाज शेअर बाजारातील तज्ज्ञांनी वर्तवला होता.
आयपीओला कसा मिळाला प्रतिसाद
Anand Rathi Wealth चा आयपीओ 2 डिसेंबर ते 6 डिसेंबर खुला होता. गुंतवणुकदारांचा आयपीओला साधारणपणे प्रतिसाद मिळाला. हा आयपीओ 7.76 पटीने सब्सक्राइब झाला होता.
कंपनीचा व्यवसाय काय?
आनंद राठी वेल्थ फायनान्शियल सर्व्हिसेस म्युच्युअल फंड वितरण आणि इतर आर्थिक गुंतवणुकीबाबतच्या व्यवहारांवर लक्ष केंद्रित करते. कंपनीने आर्थिक वर्ष 2002 मध्ये AMFI नोंदणीकृत म्युच्युअल फंड वितरक म्हणून काम सुरू केले. तर, 31 मार्च 2019 ते 31 ऑगस्ट 2021 या कालावधीत कंपनीची मालमत्ता अंतर्गत व्यवस्थापन (AUM) 22.74 टक्क्यांनी वाढून 302.09 अब्ज रुपये झाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- EPFO News : 23.34 कोटी ईपीएफओ खातेधारकांसाठी खुशखबर; सरकारकडून 2020-21 वर्षाचं व्याज जमा
- शेअर बाजारात Tega Industries ची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणुकदारांना केले मालामाल!
- टेक महिंद्रात अभियंत्यांना मोठी संधी; 600 जागा भरणार
- RBI गर्व्हनर शक्तिकांत दास म्हणाले, डिजीटल करन्सी येणार, पण....
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha