Tech Mahindra firm : टेक महिंद्रा समूहातील कॉम्विवाने 600 अभियंत्यांची भरती करण्याचे ठरवले आहे. ही भरत जुलै 2022 पर्यंत करण्यात येणार आहे. कंपनीची होत असलेली वाढ आणि कर्मचाऱ्यांची कमतरता याचा विचार करता ही भरती प्रक्रिया होणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
कंपनीने टीयर-2 शहरांवर लक्ष केंद्रीत केले आहे. भुवनेश्वर केंद्राचा कंपनीकडून विस्तार करण्यात येणार आहे. कंपनीच्या धोरणाचा भाग एक भाग म्हणून हे केंद्र तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते असे कॉम्विवा कंपनीचे सीईओ मनोरंजन महापात्रा यांनी पीटीआयला सांगितले.
महापात्रा यांनी सांगितले की, आमच्याकडे सध्या 200 कर्मचाऱ्यांची टीम आहे. एका वर्षात 600 जणांची भरती करणार आहोत. त्यातील 300 जणांची भरती कॅम्पसमधून करण्यात येईल. तर, 300 जागांवर अनुभवी कर्मचाऱ्यांना संधी देण्यात येणार आहे.
चालू आर्थिक वर्षात कॉम्विवा कंपनीला 10-12 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. कंपनीने 2021 च्या आर्थिक वर्षात 845.1 कोटी रुपयांची कमाई केली होती. ही कंपनी मोबाइल आधारीत अॅप्लिकेशन आणि तंत्रज्ञानावर काम करते. स्मार्टवॉचमधून तुम्ही पैशांचा व्यवहार करता येईल यावर कंपनीचे संशोधन सुरू असून लवकरच हे तंत्रज्ञान उपलब्ध होईल असे कंपनीने म्हटले आहे.
भुवनेश्वरमध्ये कंपनीचे सध्या 20 कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, येत्या काही महिन्यात ही संख्या वाढवण्यात येणार आहे. सध्याच्या आर्थिक वर्षात 60 ते 70 जण कार्यरत असणार आहेत. येत्या दोन वर्षात 200-300 जणांची भरती या केंद्रासाठी करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या काळात आयटी कंपन्यांची चांगली वाढ झाली होती. आयटी क्षेत्राचा विस्तार होत असून रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- भारतीय सांख्यिकी संस्थेच्या प्राध्यापिका नीना गुप्तांना रामानुजन पुरस्कार, हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या गुप्ता चौथ्या भारतीय
- India Post Recruitment 2021 : पोस्ट ऑफिसमध्ये मोठी भरती; पोस्टमनसह अनेक पदांसाठी परिपत्रक जारी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha