Tega Industries Shares Listing: टेगा इंडस्ट्रीजचा शेअर आज बीएसई आणि निफ्टीमध्ये सूचीबद्ध झाला. टेगा इंडस्ट्रीजने शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री केली असून सूचीबद्ध होताना गुंतवणुकदारांना जबरदस्त नफा मिळवून दिला आहे. आयपीओमध्ये कंपनीने प्रत्येक शेअरसाठी 453 रुपये निश्चित केले होते. शेअर बाजारात आज सूचीबद्ध होताना टेगा इंडस्ट्रीजचा स्टॉक 68 टक्के प्रीमियमने 753 रुपयांवर सूचीबद्ध झाला. जवळपास प्रत्येक शेअरमागे गुंतवणूकदारांना 300 रुपयांचा फायदा झाला.
टेगा इंडस्ट्रीजच्या आयपीओला मोठा प्रतिसाद मिळाला. टेगा इंडस्ट्रीजचा आयपीओ 219 टक्क्यांनी सब्सक्राइब झाला होता. ग्रे मार्केटमध्येही जबरदस्त प्रीमियम दिसत होता. ग्रे मार्केटमध्ये 82 टक्के प्रीमियम सुरू होता.
कंपनी करते काय?
ही कंपनी खाण उद्योगाशी संबंधित आहे. टेगा इंडस्ट्रीजचा बहुतांशी व्यवसाय हा भारताबाहेर आहे. मात्र, कंपनीचे बिझनेस मॉडेल हे इतर कंपन्यांपेक्षा वेगळे आहे. ही कंपनी पॉलिमर आधारित मिल लाइनरची दुसरी सर्वात मोठी उत्पादक आहे आणि तिचे गुजरातमध्ये दोन आणि भारतातील पश्चिम बंगालमध्ये एक प्लांट आहे. त्याशिवाय, कंपनीचे चिली, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्येही प्लांट आहेत.
सेन्सेक्सने ओलांडला 59 हजाराचा टप्पा
सेन्सेक्सची सुरुवात आज दमदार झाली. बाजार सुरू झाल्यानंतर काही वेळेतच सेन्सेक्स 360 अंकांनी वधारला होता. सेन्सेक्सने 59 हजारांना आकडा ओलांडला. त्याशिवाय निफ्टी वधारला असल्याचे दिसून आले. निफ्टीत 17,580 च्या आसपास ट्रे़ड करत आहे. निफ्टीने जवळपास 100 अंकांने उसळण घेतली होती
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- ATM Cash Withdrawal Charge : 1 जानेवारीपासून ATM मधून कॅश काढणं महागणार; जाणून घ्या नियम काय?
- लवकरच Nifty 50 आणि बँक निफ्टीत बदल, जाणून घ्या कोणता स्टॉक असेल इन अन् कोणता आऊट!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha