Amul Milk News : दूध व्यवसायाच्या (Dairy Business) संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. भारतातील (India) आघाडीची दूध डेअरी अमूल (Amul) आता अमेरिकेत (America) दुधाचा व्यवसाय करणार आहे. कोणत्याही परदेशात दुधाचा व्यवसाय करणारी अमूल ही देशातील पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. अमूलने अमेरिकेच्या मिशिगन मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशन (MMPA) या कंपनीसोबत करार केला आहे. अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील भागात अमूल ताजे दूध विकण्याचा व्यवसाय करणार आहे.


गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन अर्थात अमूलचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी या कराराबातची माहिती दिली आहे. आता भारतातील अमूल ब्रँड अमेरिकेत दुधाचा व्यवसाय करणार आहे. याचा मोठा फायदा देखील या संस्थेला होणार आहे. अमुलने अमेरिकेतील  108 वर्ष जुन्या असलेल्या मिशिगन मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशनसोबत करार केल्याची माहिती मेहता यांनी दिली. दरम्यान, अमेरिकेत मोठ्या प्रमाणात भारतीय आणि अशियायी लोक राहतात. याच दुष्टीनं त्या ठिकाणी अमूलचा व्यवसाय करण्यात येणार असल्याचे मेहता म्हणाले. अमूल अमेरिकेत 3.8 लीटर आणि 1.9 लीटरचे पॅकिंग करुन दुधाची विक्री करणार आहे.


भारतात अमूलचे दर काय?


अमूल ही भारत देशामधील एक प्रमुख दूध उत्पादक सहकारी संस्था आहे. मोठ्या प्रमाणात दुधाचं सकलन या संस्थेमार्फत केलं जाते. देशातील विविध ठिकाणी याठिकाणाहून दूध नेलं जातं. सध्या भारतात या दुधाला प्रति लिटरला 54 रुपयांचा दर मिळत आहे. तर अर्धा लिटर म्हणजे 500 मीली दुधाला 27 रुपयांदा दर मिळत आहे. तर 180 मीली दूध 10 रुपयांना मिळत आहे. तर अमूल गोल्ड दूध थोडं महाग आहे. अमूल गोल्ड दूध हे प्रतिलिटर 66 रुपये आहेस तर अर्धा लीटर दूध हे 33 रुपये आहे. 


जागतिक दूध उत्पादनात भारताचा वाटा हा 21 टक्के वाटा


1950 ते 1960 च्या दशकात दुधाच्या बाबतीत भारताची स्थिती एवढी चांगली नव्हती. त्याकाळी दुधाची मोठी कमतरता देशात होती. मात्र, त्यानंतरच्या काळात भारताने हळूहळू दूध उत्पादन क्षेत्रात मोठी भरारी घेतली. सध्या जागतिक दूध उत्पादनात भारताचा वाटा हा 21 टक्क्यांचा आहे.  



अमूल संदर्भात माहिती


अमूल ही भारत खूप मोठी प्रमुख दूध उत्पादक सहकारी संस्था आहे. या डेअरीची स्थापना 1946 साली करण्यात आली होती. भारतात दूध क्रांती घडवून आणण्यात अमूलचा मोठा वाटा आहे. पद्मभूषण त्रिभुवनदास पटेल यांनी अमूलची स्थापना केली होती. 


महत्वाच्या बातम्या:


Amul Franchise Business: 'अमूल'सोबत करा व्यवसाय; कमी वेळेत मिळू शकतो चांगला फायदा